Eknath Shinde MLA Group Sarkarnama
विशेष

एकनाथ शिंदेंनी सह्याद्रीवरील त्या बैठकीत आमदारांना दिले हे आश्वासन!

मंत्रिपदाच्या चर्चेत असलेले बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीच सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी रात्री उशिरापर्यंत आमची बैठक चालल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मंत्रिडळाचा विस्तार (Cabinet expansion) करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मोठी कसरत झाल्याचे आता पुढे येत आहे. कारण, मंत्रिपदाच्या चर्चेत असलेले बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीच सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी रात्री उशिरापर्यंत आमची बैठक चालल्याचे स्पष्ट केले आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवा. हा कार्यकर्त्यांमधील मुख्यमंत्री आहे. तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही,’ अशा शब्दांत आमदारांना आश्वासित केले आहे, असे आमदार शिरसाट यांनीच सांगितले. (This Eknath Shinde will not let you miss anything : CM assures MLAs)

दरम्यान, याच बैठकीत मंत्रिपदाच्या यादीत नाव नसल्याचे पाहून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे सांगितले जाते. त्यांचा तो आक्रमक पावित्रा पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी काहीसी नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंडात सुरुवातीपासून शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे शिरसाट यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. आता तो कोणाच्या समावेशामुळे झाला याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

आमदार शिरसाट म्हणाले की, प्रत्येक आमदाराला आपले नाव मंत्रिमंडळाच्या यादीत असावे, असे वाटत असते. प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधी संधी मिळावी. संधी मिळाली नाही म्हणून नाराज आहे, असे प्रत्येक आमदार मनाशी ठरवायला लागले तर सर्वांनाच मंत्री करावे लागेल. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आमची सह्याद्री अतिथीगृहात जी बैठक झाली, त्यात कोणाला संधी द्यायची. त्या घटकामधील मीही एक घटक होतो; म्हणून त्याची माहिती मलाही होती.

सह्याद्री अतिथीगृहात बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना एक प्रकारचा विश्वास दिला आहे. माझ्यावर, या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवा. हा कार्यकर्त्यांमधील मुख्यमंत्री आहे. मी तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही,’ असे आश्वासान आमदारांना दिले आहे, असे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT