"Veteran BJP leader Vijay Kumar Malhotra, known for defeating Manmohan Singh in Lok Sabha elections, passes away." Sarkarnama
विशेष

BJP Leader Passes Away : मनमोहन सिंग यांना पराभवाचा धक्का देणारा नेता हरपला; त्यांच्या खेळीने काँग्रेसची उडाली होती दाणादाण...

Vijay Kumar Malhotra The Leader Who Defeated Manmohan Singh in Lok Sabha Elections : मनमोहन सिंग यांची स्वच्छ प्रतिमा म्हणून देशभरात ओळख होती. देशातील आर्थिक सुधारणांमुळे त्यांचे नाव घराघरांत पोहचले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून उतरवले होते.

Rajanand More

Political Career and Legacy of Vijay Kumar Malhotra : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकसभेचे पाचवेळा खासदार आणि दिल्ली विधानसभेत दोनदा आमदार म्हणून कारकीर्द गाजविलेल्या मल्होत्रा यांच्यासाठी एक विजय सर्वात मोठा ठरला होता.

दिल्लीचे राजकारण अनेक वर्ष गाजवलेल्या मल्होत्रा यांच्यासाठी 1999 ची लोकसभा निवडणूक खास ठरली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामध्ये देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश होता. विजय कुमार मल्होत्रा यांनी त्यांचा पराभव केला होता. दक्षिण दिल्ली मतदारसंघातून मल्होत्रा यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

मनमोहन सिंग यांची स्वच्छ प्रतिमा म्हणून देशभरात ओळख होती. देशातील आर्थिक सुधारणांमुळे त्यांचे नाव घराघरांत पोहचले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून उतरवले. या मतदारसंघात पंजाबी-शिखांचे मतदानही अधिक असल्याने त्यांच्या विजयाची काँग्रेसला खात्री होती. पण त्यावेळी दिल्लीसह देशातील अनेक भागांत भाजपने आपली ताकद वाढविली होती.

भाजपने मल्होत्रा यांना मनमोहन सिंग यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवत अर्धी लढाई जिंकल्याचे मानले जात होते. संघ परिवारशी घनिष्ठ संबंध असलेल्या मल्होत्रा यांची संघटनेवर मजबूत पकड होती. तगडा जनसंपर्क होता. मल्होत्रा यांनी निवडणुकीच्या प्रचारात त्याचाच फायदा उचलत केवळ आपलाच मतदारसंघ नव्हे तर दिल्लीतील इतर मतदारसंघातही जोरदार प्रचार केला.

मल्होत्रा यांची खेळी यशस्वी ठरली अन् मनमोहन सिंग यांचा तब्बल 30 हजार मतांनी पराभव झाला. एवढेच नाही तर जगदीश टायटलर आणि आर. के. धवन यांच्यासारख्या दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मनमोहन सिंग यांच्यासाठी हा जिव्हारी लागणारा पराभव ठरला होता. त्यावेळी ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. पण त्यांच्या स्वच्छ प्रतिमा अन् अर्थतज्ज्ञ म्हणून गाजविलेल्या कारकीर्दीचा उपयोग मतांसाठी होऊ शकला नाही.

मल्होत्रा यांची रणनीती त्यावेळी यशस्वी ठरली होती. ते 1977-84 असे सात वर्षे भाजपचे दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. तसेच दिल्ली प्रदेश जनसंघाचे अध्यक्ष म्हणून 1972-75 या कालावधीत त्यांनी काम केले होते. दिल्लीत भाजपचा पाया मजबूत करण्यात मल्होत्रा यांचा मोठा हातभार होता. त्याचाच त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT