Mumbai Terror Attack news : चिदंबरम यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'पाक'चा बदला घेण्याचा विचार होता, पण...

P. Chidambaram’s Revelation on 26/11 Response : पंतप्रधान आणि इतर महत्वाच्या लोकांसोबत याबाबत चर्चाही केली होती, असा मोठा गौप्यस्फोट पी. चिदंबरम यांनी केला आहे.
“Former Home Minister P. Chidambaram admits UPA govt avoided military retaliation against Pakistan after 26/11 due to US pressure.”
“Former Home Minister P. Chidambaram admits UPA govt avoided military retaliation against Pakistan after 26/11 due to US pressure.”Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट: मुंबई 26/11 हल्ल्यानंतर यूपीए सरकारने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईचा विचार केला होता, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे निर्णय बदलला गेला.

  2. अमेरिकेचा दबाव: तत्कालीन परराष्ट्र मंत्री कोंडोलीसा राइस यांनी भारताला पाकिस्तानवर प्रत्युत्तर देऊ नये, असा सल्ला दिल्याचे चिदंबरम यांनी कबूल केले.

  3. भाजपचा पलटवार: भाजपने म्हटले की परदेशी दबावामुळे देशहिताचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले गेले आणि हा खुलासा त्याचं पुष्टीकरण आहे.

Impact of UPA Government’s Stance on National Security : मुंबईत 2008 मध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन यूपीए सरकारने हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्याचा विचार केला होता, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. पण सरकारला दबावामुळे लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.

चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर चिदंबरम यांनी काही दिवसांतच गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता. या हल्ल्यात 175 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याला त्यावेळी जिवंत पकडण्यात आले होते. नंतर त्याला फासावर लटकविण्यात आले होते.

चिंदबरम यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की, त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबाव होता. संपूर्ण जग त्यावेळी म्हणजे होते युध्द सुरू करू नका. परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे पाकिस्तानवर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते म्हणाले, अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कोंडोलीसा राइस या मी कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मला व पंतप्रधानांना भेटायला आल्या होत्या. पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊ नये, असे त्या म्हणाल्याची कबुली चिदंबरम यांनी दिली आहे.

“Former Home Minister P. Chidambaram admits UPA govt avoided military retaliation against Pakistan after 26/11 due to US pressure.”
विरोधकांना धडकी भरविणाऱ्या सुपरस्टार विजय यांचा राजकीय ‘गेम’? धक्कादायक माहिती...

मी त्यावेळी म्हणालो होतो की, हा निर्णय सरकार घेईल. त्यावेळी बदला घेण्याचा विचार माझ्या मनात आला होता. याबाबत पंतप्रधान आणि इतर महत्वाच्या लोकांसोबत याबाबत चर्चाही केली होती, असा मोठा गौप्यस्फोट चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या या खुलाशानंतर भाजपने पलटवार केला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘परदेशातील दबावामुळे चुकीच्या पध्दतीने मुंबई हल्ल्यानंतरचे निर्णय घेण्यात आल्याचे देशाला आधीच माहिती होती. हे माजी गृहमंत्र्यांनी स्वीकारले आहे.’ भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मुंबई हल्ल्यानंतर सुरूवातीला चिदंबरम गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांना पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई हवी होती. पण त्यांच्यावर इतरांचा दबाव होता.

“Former Home Minister P. Chidambaram admits UPA govt avoided military retaliation against Pakistan after 26/11 due to US pressure.”
Election petition : कोर्टाची भाजप सरकारला चपराक; सत्ताधारी पक्षाशी संबंधित निवडणूक याचिकेवर 5 वर्षांत अन् इतरांसाठी 5 महिन्यांत निर्णय…

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: चिदंबरम यांनी कोणता खुलासा केला?
A: 26/11 हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लष्करी कारवाईचा विचार झाला होता, पण तो आंतरराष्ट्रीय दबावामुळे थांबवला गेला.

Q2: अमेरिकेची भूमिका काय होती?
A: कोंडोलीसा राइस यांनी भारताला पाकिस्तानवर प्रत्युत्तर न देण्याचा सल्ला दिला होता.

Q3: भाजपची प्रतिक्रिया काय आहे?
A: भाजपने यूपीए सरकारवर परदेशी दबावाला बळी पडल्याचा आरोप केला.

Q4: या हल्ल्यात किती जण मृत्यूमुखी पडले?
A: 175 जणांचा मृत्यू झाला, त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारीही होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com