आज महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तापलेला असताना. जगातील सर्वात पहिली निवडणूक कधी झाली, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मतदानाची ही संकल्पना नेमकी कुठून सुरू झाली याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी नुकतेच मतदान पार पडले असून निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकांच्या चर्चा रंगात असताना, लोकशाहीचा पाया कसा घातला गेला जाणून घेऊया?
काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, जगातील पहिल्या आधुनिक अर्थाने झालेल्या निवडणुका 17 व्या शतकाच्या सुरुवातीला युरोप आणि उत्तर अमेरिकेत झाल्याचे मानले जाते. त्या काळात लोकशाहीचे तत्त्व विकसित होत होते; मात्र मतदानाचा अधिकार सर्वांसाठी नव्हता. पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेत सुरुवातीला फक्त पुरुषांनाच मतदान करण्याची मुभा होती. महिलांना हे मूलभूत अधिकार मिळण्यासाठी बराच काळ थांबावे लागले. अखेरीस 1928 मध्ये महिलांनाही पुरुषांसारखा समान मतदानाचा अधिकार दिला गेला आणि लोकशाही प्रक्रियेला नवे आयाम मिळाले.
मात्र, मतदान प्रक्रियेचा इतिहास याहूनही प्राचीन आहे. सुमारे 508 इसवी सन पूर्व, प्राचीन ग्रीसच्या अथेन्स शहरात नागरिक लोकशाहीची एक अनोखी पद्धत राबवत होते. तेथील नागरिक इच्छेनुसार कोणत्याही राजकीय नेत्याला 10 वर्षांसाठी देशातून बाहेर करण्याचा निर्णय घेऊ शकायचे. या प्रक्रियेस 'ओस्ट्रासिझम' किंवा ओस्ट्राका प्रथा म्हणतात. यामध्ये नागरिक मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांवर आपल्या पसंतीचे नाव लिहून मतदान करायचे. आज ज्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जातो, त्यापेक्षा ही पद्धत खूप वेगळी आणि प्राचीन असली तरी तिच्यातील लोकशाहीची भावना आजही तितकीच महत्त्वाची आहे.
अथेन्समध्ये त्या काळात सर्व नागरिक मतदानात सहभागी होत नव्हते. वेळोवेळी राजकारणातील अति प्रभावी व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जायची. यावरून हे स्पष्ट होते की नागरिकांच्या मताद्वारे शासनव्यवस्था ठरवण्याची संकल्पना हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होती.
आज जगभरातील लोकशाही निवडणुका आधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. परंतु त्यांचा पाया प्राचीन अथेन्ससारख्या शहरांनी घातला होता, तसेच पुढे युरोप आणि अमेरिकेत लोकशाहीचा विस्तार झाला. मतदानाचा अधिकार पुरुषांपासून महिलांपर्यंत, नंतर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आणि आज ही प्रक्रिया लोकशाहीची कणा मानली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.