Rohit Patil Sarkarnama
विशेष

Rohit Patil : राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण असेल? : रोहित पाटलांनी दिले हे उत्तर....

शरद पवार यांनी २००४ च्या मध्ये घेतलेला निर्णय आम्हाला सर्वांना मान्य होता.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पोस्टर मध्यंतरी मुंबईत झळकली. राज्यातही त्यावरून बरीच खलबतं रंगली. विशेष म्हणजे ज्या नेत्यांची पोस्टर्स लागली होती, त्यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. आज त्याबाबत (स्व.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता रोहित पाटील (Rohit Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे. (Who will be the Chief Minister of NCP? : Answer given by Rohit Patil)

तुमच्या मनातील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण, असा जेव्हा रोहित पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हजरजबाबी आणि कसलेल्या राजकारण्याप्रमाणे रोहित पाटील यांनी ‘पवारसाहेब जे सांगतील ते असतील’ असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात आरआर आबांची झलक पहायला मिळाल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सांगलीत आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जास्त आमदार निवडून आलेले असतानासुद्धा शरद पवार यांनी मुख्यमंत्री स्वीकारण्याऐवजी जादा मंत्रीपद घेतली. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला सर्वांना तो मान्य होता. आजही आम्ही पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आजही पवार सांगतील, तेच मान्य असेल. तीच आमच्या सर्वांची भावना आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातही रोहित पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षतता असणेही गरजेचे आहे. ती कुठंतरी जाणवत नसल्यामुळे तसेच, आपल्याबरोबर आपल्या पाल्याचे भविष्यही कुठेतरी अंधारात जातंय की काय, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळेच जुन्या पेन्शनची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. सेवाकाळात एखाद्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती घ्यावीशी वाटली तर त्याला त्या योजनांचा लाभ आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT