Deepak Kesarkar : ठाकरेंची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने विकत घेतली : दीपक केसरकरांचा हल्लाबोल

जयंत पाटील हे सावंतवाडीत एक महिला उमेदवार घेऊन आले आणि राष्ट्रवादीच्या भावी आमदार असा प्रचार करून गेले होते.
Uddhav Thackeray-Aaditya Thackeray- Deepak Kesarkar
Uddhav Thackeray-Aaditya Thackeray- Deepak KesarkarSarkarnama

सावंतवाडी : मी महाविकास आघाडीचा आमदार असतानाही जयंत पाटील हे सावंतवाडीत एक महिला उमेदवार घेऊन आले आणि राष्ट्रवादीच्या भावी आमदार असा प्रचार करून गेले. आपल्याच पक्षाच्या आमदारावर होणारा हा अन्याय, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना दिसला नव्हता का? ठाकरेंची शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतली आहे, असा टोला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. (Thackeray's Shiv Sena bought by Congress-NCP : Deepak Kesarkar)

आमदार रवींद्र फाटक यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाली. त्यानंतर सावंतवाडीत शिवसैनिकांच्या मेळाव्यात केसरकर बोलत होते. या वेळी फाटक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे उपस्थित होते.

Uddhav Thackeray-Aaditya Thackeray- Deepak Kesarkar
Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेनेत पदावरून वाद पेटला; शहरप्रमुखांना अवघ्या सात महिन्यांत बदलले

केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला आम्ही कोणीही सांगितले नव्हते. त्यांनी फक्त महाविकास आघाडीची साथ सोडावी, एवढीच आमची मागणी होती. मात्र, उद्धव ठाकरेंना त्यांच्या आमदार-खासदारांपेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार जवळचे वाटले. खरी गद्दारी ठाकरे गटानेच केली आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपला मतदान केले होते. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यातही शिवसेना आमदारांवर वारंवार अन्याय होऊ लागला. त्या नाराजीतूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती.

Uddhav Thackeray-Aaditya Thackeray- Deepak Kesarkar
Jalgaon District Bank : संजय पवारांना उमेदवारी द्या, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संचालक खडसेंना चार दिवसांपासून सांगत होते : गुलाबरावांचा गौप्यस्फोट

मी शिवसेनेत येण्यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये पक्षाला केवळ चाळीस हजार मतदान होते. मात्र, माझ्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला एक लाख पन्नास हजार एवढे मतदान वाढले. माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे ही ताकद मला मिळाली आहे. पक्षवाढीसाठी स्वतःची प्रॉपर्टी विकून मी काम केलेले आहे, त्यामुळे ठाकरे पिता-पुत्रांनी खोके घेतल्याचा आरोप माझ्यावर करताना विचार करावा; अन्यथा मी अशी स्लोगन तयार करेल की तुम्ही राज्यात डोकं वर काढू शकणार नाही, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

Uddhav Thackeray-Aaditya Thackeray- Deepak Kesarkar
Jalgaon District Bank : शिवसेना, काँग्रेसने आमचा विश्वासघात केला : जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवानंतर खडसेंचा आरोप

आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षांत काय केले?

आम्ही मान्य करतो की, उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसते. पण, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे २८ वर्षांचे तरुण आहेत. अडीच वर्षांत त्यांनीही काय केले? स्वतःच्या कार्यालयातही ते कधी गेले नाहीत. पक्ष आणि संघटना घरात बसून वाढत नसते, त्यासाठी राज्यात फिरावं लागतं, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com