Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Sarkarnama
विशेष

Bharat Jodo Yatra News : राहुल गाधींच्या भारत जोडो यात्रेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

Bharat Jodo Yatra News : राहुल गांधी यांची यात्रा सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली आहे

सरकारनामा ब्यूरो

Bharat Jodo Yatra News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यातही तरुणांचा प्रतिसाद मोठा आहे. आज (ता. 8) वाजल्यापासून राहुल गांधी यांची ही पदयात्रा सुरू झाली. राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान, बाळासाहेब थोरात यात्रेत सहभागी झाले.

तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) नेत्यांसह राज्यभरातील हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले. याबरोबरच 'भारत जोडो' यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाल्याचे पाह्यला मिळत आहे. भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेचे महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.

भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली आहे. हजारो मशाली हाती घेऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी देगलूर येथे दाखल झाली. या वेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते. यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

गॅस दर वाढ, पेट्रोलची दरवाढ विरोधातील बॅनर घेऊन काँग्रेस नेते विश्वजीत कदम यात्रेत सहभागी झाले. भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास कदम यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुलींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT