Mahavikas Aghadi 
विश्लेषण

काॅंग्रेसच्या 25 आमदारांमुळे ठाकरे सरकारची झोप उडालीय... काहीही होऊ शकतं!

Maharashtra Politics : महाविकास आघाडीसमोर रोज नवीन आव्हाने

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. या शंकेत भर घालणारी परिस्थिती सध्या चर्चेत आहे. ही चर्चा आहे ती काॅंग्रेस आमदारांच्या गोटातील. यातील अनेक आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येते. हा आकडा थोडाथिडका नसून 25 पर्यंत असल्याचे बोलण्यात येते. शिवसेनेचे नेते हे थेट राष्ट्रवादीच्या विरोधातील नाराजी व्यक्त करत असले तरी काॅंग्रेसचा कोणताही नेता थेट उघडपणे सरकारविरोधात बोलत नाही. पण राजकीय गोटातील चर्चेनुसार काॅंग्रेस आमदारांत खदखद असल्याचे सांगण्यात येते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसला महत्व दिले जात नाही आणि काॅंग्रेसच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही, असे दोन महत्वाचे नाराजीमागे आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसारखा विषयही काॅंग्रेसच्या नेत्यांना सोडविता येत नाही. महत्वाच्या निर्णयात पक्षाला गृहित धरण्यात येते. काॅंग्रेसचे अस्तित्व या सरकारमध्ये जाणवत नाही, असे यातील आमदार बोलतात. त्यामुळे हे आमदार आपल्या नेत्यांकडे नाराजी व्य्कत करत आहेत. त्यात उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर ही अस्वस्थता वाढली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

त्यात युपीएच्या (UPA) अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आणून काॅंग्रेसला दुय्यम लेखण्याचे काम सुरू असल्याच्याही मुद्याची भर पडली आहे. येथे सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांना अध्यक्ष करावे, असा ठराव राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवक शाखेने केला. त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळेही काॅंग्रेस नाराज आहे.

पण याबाबीत तथ्य नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत. त्यात काही तथ्य नाही आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात त्यात नवे काही नाही. शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे, काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यानी वरिष्ठ नेत्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT