Nana Patole
Nana PatoleSarkarnama

कुणीही हे विसरू नये की, कॉंग्रेस बाप आहे; नाना पटोले गरजले...

सध्या एकाला एक व दुसऱ्याला दुसरा न्याय केला जात आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मत नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले.
Published on

भंडारा : हा देश कॉंग्रेसने स्वतंत्र केला आहे. कॉंग्रेसनेच देश मोठा केला. त्यामुळे जे लोक कॉंग्रेसच्या विरोधात बोलतात, ते नादान आहेत. कॉंग्रेसच्या भरवशावर मोठे झालेले नेते आता विरोधात बोलू लागले आहेत, याची खंत वाटते. पण त्यांनी विसरू नये की, कॉंग्रेस बाप आहे, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

कॉंग्रेस (Congres) म्हणजे ‘बिन बुलाये मेहमान’ नाही, असे सांगताना कॉंग्रेसच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. न्याय व्यवस्थेत संभ्रम व अविश्वास निर्माण होत आहे. देशात मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून न्याय व्यवस्थेतसुद्धा भेदभाव होत आहे. आपल्या देशाच्या संविधानानुसार सर्वांना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. पण सध्या एकाला एक व दुसऱ्याला दुसरा न्याय केला जात आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मत नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले.

मुंबई बॅंकेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचे मुख्य सूत्रधार भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत, लेखा परीक्षणाचा अहवाल तसं सांगतो आहे आणि त्या आधारावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मध्यंतरीच्या काळात अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांना अटक करू नये, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. आता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा निर्णय झाला आहे. पण बॅंकेचे नियम धाब्यावर बसवून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्या बॅंकेत झालेला आहे. आ न्यायालय त्याबाबत निर्णय घेईल, असे पटोले म्हणाले.

Nana Patole
केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात नाना पटोले मैदानात

सत्तापिपासू लोकांची पहाटेची सरकार गेल्यानंतर त्यांची तडफड सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यासंदर्भात नित्य नवी वक्तव्य ती लोक करीत असतात. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागीदारी आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जो किमान समान कार्यक्रम दिला आहे, तो कोरोनाच्या काळात दोन वर्ष राबविता आला नाही. पण आता हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याचा त्रास विरोधकांना होतो आहे. म्हणून दररोज नवनव्या अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. भाजपची नजर काळी आहे. मात्र त्यांच्या काळ्या जादूचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com