Dr. Jyoti Mete Sarkarnama
विश्लेषण

उदय सामंतांचा दावा; शिवसंग्रामचे उत्तर : डॉ. ज्योती मेटे कर्तव्यनिष्ठ अधिकारी अन्...

Bead News : मागील आठवड्यात शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Dattatrya Deshmukh

Bead News : अनेक वर्ष मराठा आरक्षणासह विविध विषयावर शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून लढा उभारलेल्या आमदार लोकनेते विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटनेचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, संघटनेशी अनेक वर्ष जोडलेल्या कार्यकर्त्यांनी मेटे यांच्यानंतरही त्याचा लढा सुरु ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे.

मात्र, मागील आठवड्यात शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शिवसंग्राम संघटना (ShivSangram) फोडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. यानंतर संघटनेची मुंबईत बैठक झाली या बैठकीला मोठ्या संख्यने पदाधिकाऱ्यारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये संघटनेचे काम विनायक मेटे यांनी ज्या मुद्यांवर सुरु केले होते. ते मुद्दे पुन्हा त्याच जोमाने पुढे घेऊन जायचे असे ठरले. त्यामुळे शिवसंग्राम आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण, शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हे या मुद्यावर पुढे मार्गक्रमन करणार आहे. यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी हे ज्योती मेटे यांच्या पाठिशी उभे असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या हयातीत देखील डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) कायम राजकीय झगमगाटापासून दुर राहिल्या आहेत. त्या नोकरीला आहेत, उच्चशिक्षीत आहेत येवढीच त्यांची ओळख निकटवर्तीयांमध्ये होते. मितभाषी, संयमी असलेल्या डॉ. ज्योती मेटे यांनी दिवंगत मेटे यांच्यानंतर शिवसंग्रामची सूत्रे हाती घेतली आहे. संघटना, कुटूंब आणि नोकरी अशी तिहेरी कसरत त्या करत आहेत.

उद्योग मंत्री सामंतांसोबत बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ एकच पदाधिकारी शिवसंग्रामचा होता. बाकीचे कोणीही शिवसंग्रामचे नव्हते. मात्र, कोणतीही खतरजमा न करता त्यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी असल्याचे सांगितले, असा दावा प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी केला होता. त्यानंतर शिंदे गटाकडूनही काही प्रतिक्रिया आल्या नाही. मात्र, संघटनेचे पदाधिकारी फुटले नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद ज्योती मेटे यांनी घ्यावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. मात्र, त्यावर मेटे यांनी विचार करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तरी पद न स्विकारताही त्या संघटनेमध्ये सक्रीय आहेत.

कधीही कारवायांचा गाजावजा नाही, बडेजाव आणि आपल्यामागील राजसत्तेचा आयुर्भाव नाही, राजकीय झगमगाटापासून दुर राहूनही डॉ. ज्योती मेटे यांनी आपल्या कर्तत्वाने व प्रामाणिकपणाने राज्याच्या सहकार विभागात आपली कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय पदवीधारक असलेल्या डॉ. ज्योती मेटे यांनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपनिबंधक पदाचा मुकूट आपल्या माथी चढविला. सध्या लातूर येथे विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. ज्योती मेटे यांच्या अधिपत्याखाली चार जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था आहेत.

चार जिल्ह्याच्या अधिकारी; कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख

दरम्यान, डॉ. ज्योती मेटे लातूरच्या विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. लातूरसह नांदेड, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्याच्या त्या सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत. या जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, पतपेढ्या अशा लहान - मोठ्या १० हजार संस्था त्यांच्या अधिपत्याखाली आहेत.

त्यांनी त्यांच्या प्रशासनिक कारकिर्दीत नांदेड, रायगड, मुंबई, मंत्रालय, एमएमआरडीए, कोकण, नाशिक आदी विभागात उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक म्हणून काम केले. सध्याची त्यांची नववी पदस्थापना आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रशासनिक कारकिर्दीत त्यांच्यावर कधीही आरोप, खातेनिहाय चौकशी झालेली नाही. त्यांच्याच कारकिर्दीत कोकण विभागीय सहनिबंधक व त्यांच्या अधिनस्थ असलेले पनवेल व ठाणे सहाय्यक निबंधक कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT