Pimpri: News : लोकसभा निवडणुकीच्या उद्या (ता.४) लागणाऱ्या निकालाने देशात एनडीए आणि इंडिया आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. तशीच धडधड ही महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीचीही वाढली आहे.त्यातही अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची धाकधूक,तर निकाला अगोदरच्या या एक्झिट पोलने प्रचंड वाढवून ठेवली आहे.
राज्यात महायुतीत भाजपने २८,शिंदे शिवसेनेने १५,राष्ट्रवादीने ४ आणि रासपच्या महादेव जानकरांनी एक जागा लढविली आहे.त्याचा फैसला उद्या येणार आहे.पण,एक्झिट पोलने तो १ तारखेलाच लावला.त्याने महायुतीतील राष्ट्रवादीची मोठी चिंता वाढवून ठेवली. त्यातही त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या ह्रदयाचे ठोके त्यामुळे सध्या जोरात पडू लागले आहेत.एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला,तर अपयशाचे बिल तटकरेंवरच फाडले जाणार,यात शंका नाही.त्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल.त्यातून त्यांची पदावरून उचलबांगडी ही होऊ शकते.
टीव्ही ९ आणि पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये,तर महायुतीतील राष्ट्रवादीचा भोपळाही फुटणार नाही,असा अंदाज आहे. तसं झालं,तर अजित पवारच नाही,तर तटकरेंनाही मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागणार आहे.त्यातून आगामी विधानसभेला,जर महायुती राहिली,तर जागावाटप करताना त्यांची बार्गेनिंग पावर खूपच कमी होणार आहे.तटकरे हे,तर ,स्वत रायगडमधून उमेदवार आहेत. एक्झिट पोलनुसार त्यांच्यासह अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा व शिरुरला आढळरावांचा पराभव होत आहे.तसं झालं,तर त्यांच्या जखमेवर मीठच चोळले जाणार आहे.कारण आढळरावांना ऐनवेळी शिवसेनेतून आय़ात करीत त्यांना कोल्हेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी उमेदवारी दिलेली आहे.एवढेच नाही,तर शिवसेनेच्या वाट्याचा हा मतदारसंघ स्वताकडे यावेळी घेतला. त्यात,जर पराभव करण्याचे चॅलेंज दिलेले कोल्हे विजयी झाले,तर अजित पवारांची दुहेऱी नामुष्की होणार आहे.
तटकरेंना पक्षाने भरभरून दिले.त्यातुलनेत पक्षासाठी त्यांचे योगदान या लोकसभेला काहीच नसेल,असे एक्झिट पोल सांगत आहे.तसं झालं,तर त्यांना पक्षाकडून नक्कीच विचारणा होईल.त्यांना आमदार, राज्यात पक्षाने मंत्री केलं. त्यानंतर पक्षाने संघटनेतील राज्यातील सर्वोच्च पद दिले.मुलीलाही कॅबिनेटमंत्री केलं.एवढं भरभरून दिल्यानंतर त्यांच्याकडून पक्ष संघटना आणि वाढीसाठी लोकसभा निवडणुकीच्या यशातून योगदान मिळाले नाही,तर त्यांना हिशोब,तर मागितलाच जाईल,यात शंका नाही.त्यामुळे त्यांचेच नाही,तर त्यांच्या लेकीचेही भवितव्य ठरविणारी ही निवडणूक ठरणार आहे.जर, ते स्वतच विजयी झाले नाही,तर ते इतरांना कसे निवडून आणणार अशी विचारणा त्यांना विधानसभेला पक्षातूनच केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.