Mumbai, 11 March : अजितदादांनी तब्बल 46 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे, ही तूट काळजी कारण्यासारखी आहे. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आपल्या मंत्रालयाच्या बजेला कट लागणार, असे प्रत्येक मंत्र्यांच्या मनात धास्ती असते, त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे येतानाच मंत्री ‘दादा, माझे पैसे कट करू नका,’ असे सांगत असतो. त्यामुळे या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आता अजितदादांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मंत्रिमंडळातील तुम्ही सर्व मंत्री शरण गेला तरच तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. मी या खेळातील फार जुना खेळाडू आहे, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार बॅटिंग केली. जयंतराव म्हणाले, अजितदादा आपण अकरावा अर्थसंकल्प मांडला, तो मांडत असताना आपण अनेक विक्रम केले आहेत, त्याबद्दल मी आपले पुन्हा पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. पण दुसरा जो 46 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही आपल्याच नावावर जमा झाला आहे, ती तूट काळजी करण्यासारखी आहे. त्याचा परिणाम असा होतो. मी 1999 मध्ये अर्थमंत्रिपद सांभाळलं आहे. तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यातच तीन वर्षे गेली.
अर्थमंत्र्यांकडे येणारा मंत्री येतानाच सांगतो की, अजितदादा (Ajit Pawar) माझे पैसे कट करू नका. कारण प्रत्येक मंत्र्यांच्या मनात धास्ती असते की आपल्या मंत्रालयाच्या बजेला कट लागणार. आपल्या मंत्रालयाच्या बजेटला कट लागू नये, असे प्रयत्न करत असतात आणि ४५ हजार कोटींची तूट म्हणजे फार आहे. पूर्वी चार हजार ते पाच हजार कोटी रुपयांची तूट असायची.
४५ हजार कोटी रुपयांची तूट म्हणजे या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आता अजितदादांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मंत्रिमंडळातील तुम्ही सर्व मंत्री शरण गेला, तरच तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. त्याचवेळी शेजारील बाकावरून करण्यात आलेल्या कमेंटला उत्तर देताना जयंतरावांनी ‘मी हा खेळ फार पूर्वी वर्षापूर्वी करून बसलेलो आहे, मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका’ असेही त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, राज्यात ४६ हजार कोटींची तूट म्हणजे फार मोठी आहे. मी मागंच सांगितलं होतं की, अजितदादांनी २० हजार कोटींच्या तुटीचा मांडला. त्याची २६ हजार कोटी महसुली तूट झाली. वीस हजार कोटींच्या तुटीच्या अर्थसंकल्पानंतर तीन पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला, त्याच दिवशी ९० हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या या सभागृहाने मंजूर केलेली आहे.
त्यानंतर दोन पुरवण्या मागण्या आल्या, त्या सर्वांची बेरीज एक लाख ६० हजार कोटी रुपयांची झाली. हे एक लाख ६० हजार कोटी खिशात नसताना जाहीर केले होते. एक लाख ६० हजार कोटीवरील तूट कपात करत करत ती ४६ हजार कोटींवर आली. याचा अर्थ मागच्या वर्षी सरकारने सभागृहासमोर पैसे मांडले आणि मंजूर करून घेतले, त्यातील एक लाख १० हजार कोटी रुपये खर्चच केले नाहीत. तरीही ४६ हजार कोटींची तूट आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांनी यात लक्ष घालून ही तूट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर प्रत्येकाला विश्वास येईल की आता काही अडचण नाही, आपण काम करूया, आपले पैसे मिळणार आहेत. हा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न अजितदादांनी करावा, अशी विनंती करतो, असे आवाहन जयंतरावांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.