Padalkar Vs Jayant Patil : पडळकरांचा जयंत पाटलांवर तिखट शब्दांत हल्ला; ‘जयंत पाटील हे सराईत दरोडेखोरासारखे, मागं पुरावाच ठेवत नाहीत’

Sangli District Bank Scam : जयंत पाटील हे नुसतं गोड गोड बोलत असतात. दिसायला स्मार्ट असल्यामुळे आणि परदेशात शिकून आलेले असल्यामुळे त्यांनी ‘फॉरेन रिटर्न’ असे वातावरण तयार केलेले आहे. तोंडातून साखर पडतेय की काय? असं ते बोलत असतात. पण ते तसे नाहीत.
Gopichand Padalkar-Jayant Patil
Gopichand Padalkar-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 08 March : जयंत पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सर्वेसर्वा आहेत. जयंत पाटील हे सगळं करतात, पण आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असं ते दाखवतात. जयंत पाटील हे एखाद्या सराईत दरोडेखोराला लाजवेल, असे दरोडेखोर आहेत. काही लोक आपल्याकडे चोऱ्या करायला येतात आणि मागं काही पुरावाच ठेवत नाहीत. जयंत पाटील त्यातील आहेत, मागं पुरावाच ठेवत नाहीत, अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार पाटील यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळावर (Sangli Dcc Bank ) फौजदारी गुन्हे दाखल करून बॅंकेवर प्रशासक नेमण्यात यावा. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून जयंत पाटील यांची सुरू असलेली मनमानी संपुष्टात आणली पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, जयंत पाटील (Jayant Patil) हे नुसतं गोड गोड बोलत असतात. दिसायला स्मार्ट असल्यामुळे आणि परदेशात शिकून आलेले असल्यामुळे त्यांनी ‘फॉरेन रिटर्न’ असे वातावरण तयार केलेले आहे. तोंडातून साखर पडतेय की काय? असं ते बोलत असतात. पण ते तसे नाहीत. सांगली जिल्हा सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराचे मूळ हे जयंत पाटील आहेत. पण अंधारात इकडं (भाजपमध्ये) पाया पडत फिरत असतात.

Gopichand Padalkar-Jayant Patil
Solapur Dudh Sangh : शिंदेंना अवघ्या तीन महिन्यांत दुसरा धक्का; विधानसभेतील पराभवानंतर सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळही बरखास्त

सांगली जिल्हा सहकारी बॅंकेची चौकशी आधीपासूनच सुरू आहे. सहकार अधिनियम १९६० चे कलम ८३ अंतर्गत २२ मुद्यांवर चौकशी झाली आहे, त्या चौकशी अहवालात जिल्हा बॅंकेवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्या चौकशीनुसार बॅंकेत अनागोंदी कारभार झालेला आहे, त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे, असेही आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटले आहे.

Gopichand Padalkar-Jayant Patil
Devendra Fadnavis : 'जयंतराव तुम्ही अजितदादा, अन् माझंही ऐकत नाही...', देवेंद्र फडणवीसांनी इशाऱ्या इशाऱ्यात सांगून टाकलं

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा सहकारी बॅंकेची सध्या सहकार अधिनियम १९६० चे कलम ८८ नुसार चौकशी सुरू आहे. त्या चौकशीतून चार मुद्दे वगळण्यात आले आहेत, त्या मुद्यांसह चौकशी व्हावी आणि सांगली जिल्हा बॅंकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com