Sharad Pawar Banner-Bacchu Kadu Sarkarnama
विश्लेषण

Bachchu Kadu Angry: पवारांच्या ‘बाप बाप होता है!’ बॅनरवर बच्चू कडू संतापले; ‘असे गद्दार आज अनेक पक्षांत...’

Bacchu kadu Angry On This Banner : जनतेचा बाप कोण होऊ शकतो का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Sharad Pawar Sabha: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज (ता. २५ ऑगस्ट) कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यात ‘बाप बाप होता है’ असा एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण, त्या बॅनवर माजी राज्यमंत्री बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. ‘बापापेक्षा नेता महत्त्वाचा वाटत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीचे आणि देशाची वाट लागली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी या बॅनरवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज कोल्हापुरात दसरा चौक येथे सभा होत आहे. सभेच्या वातावरण निर्मितीसाठी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘बाप बाप होत है’ अशा आशयाचे फलक चौका-चौकांत झळकले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेली बॅनरबाजी राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे.

माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांना त्या बॅनरबाबत विचारले असता त्यांनी कार्यकर्त्यांनाच शेलक्या शब्दांत चांगलेच सुनावले आहे.

माझी निष्ठा सामान्य माणसावर आणि माझ्या शेतकरी बापावर आहे. ना कोणत्या नेत्यावर ना अभिनेत्यावर आहे. माझ्या डोक्यात कोणता नेता पक्ष, जात, धर्म, पंथ, नाही. माझ्या डोक्यात केवळ जनता आहे. जनतेचा बाप कोण होऊ शकतो का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

आज कालच्या कार्यकर्त्यांना बाप मेल्याचे दुःख नाही, पण नेता मेल्याचे दुःख आहे. असे गद्दार महाराष्ट्राच्या अनेक पक्षांत आहेत. बापापेक्षा नेता महत्त्वाचा वाटत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीचे आणि देशाची वाट लागली आहे, असा प्रहारच आमदार बच्चू कडू यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT