Nitish Kumar Ekanth Shinde  sarkarnama
विश्लेषण

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांचा 'एकनाथ शिंदे' होणार? भाजपने आखला प्लॅन!

BJP Politics Nitish Kumar Bihar Eknath shinde : 2020 ला बिहारमध्ये भाजपने आपल्यापेक्षा कमी जागा असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, आता हरियाणा, महाराष्ट्रातील विजयाने भाजपने नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

Roshan More

Bihar Politics News : बिहार विधानसभा निवडणूक यंदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आले असले तरी त्यांनी त्यांची सदस्य संख्या घटली. त्यामुळे भाजपला महाराष्ट्र-हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत फटका बसले अशी चर्चा होती. मात्र, हरियाणा विधानसभे पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेत भाजपने एकतर्फी बहुमत मिळवले. बिहारमध्ये भाजपचा एकदाही मुख्यमंत्री झाला नसल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपने मोठा प्लॅन आखल्याची चर्चा आहे.

भाजप बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवू शकली नाही. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासोबत आघाडीकरून ते सत्तेत राहिला आहेत. त्यामुळे 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील नितीश कुमार हेच बिहारमधील एनडीएचा चेहरा असल्याचे सांगितले जात आहे. नितीन कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे भाजपने जाहीरपणे सांगत आहेत.

भाजप बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवू शकली नाही. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासोबत आघाडीकरून ते सत्तेत राहिला आहेत. त्यामुळे 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील नितीश कुमार हेच बिहारमधील एनडीएचा चेहरा असल्याचे सांगितले जात आहे. नितीन कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे भाजपने जाहीरपणे सांगत आहेत.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जरी भाजप लढत असली तरी महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंसोबत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत झाले तेच बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांसोबत होण्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली मात्र सत्ता येताच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कमी जागांचे कारण सांगत भाजपचा मुख्यमंत्री करण्यात आला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले.

2020 ला बिहारमध्ये भाजपने आपल्यापेक्षा कमी जागा असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, आता हरियाणा, महाराष्ट्रातील विजयाने भाजपने नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला असून भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ जाईल आणि त्यामुळे नितीन कुमार यांच्या जेडीयूचा पाठींबा घेऊन भाजपचा मुख्यमंत्री करता येईल, असा भाजप नेत्यांचा प्लॅन असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द दिला नाही

भाजपने 2020 मध्ये 243 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत 74 जागांवर विजय मिळवला होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला अवघ्या 43 जागांवर विजय मिळवता आला होता. नितीश कुमार-भाजपच्या युतीमध्ये कमी जागा मिळून देखील भाजने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रि‍पदी कायम ठेवत आपला मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला होता. या निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांना भाजप-जेडीयूच्या युतीने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मुख्यंत्रिपदाचा चेहार म्हणून नितीश कुमारांच्या नावाची घोषणा अद्यापही करण्यात आली नाही.

नितीश कुमारांवर विश्वास नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे बहुमतात असले तरी त्यांच्या सरकारला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे टेकू आहे.केंद्रामध्ये भाजपला नितीश कुमार यांच्या आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये ते नितीश कुमारांच्या विरोधात उघडपणे बोलत नाही. मात्र, मुख्यमंत्रि‍पदासाठी नितीश कुमार भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या जनता दलाची साथ देऊ शकतात, याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जास्त जास्त जागा जिंकून सत्तेच्या जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा भाजपकडे नाही

सुशील कुमार मोदी हे बिहारमध्ये भाजपचे बिहारमधील मोठे नेते होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपकडे नेतृत्वाची कमतरता जाणवत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे शिवधनुष्य बिहारमधील कोणताही एक नेता पेलू शकणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व भिस्त असणार आहे.

सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे भाजपचे दोन उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, यातील एकाच्या देखील नेतृत्वात भाजप निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत जास्त जागा जिंकूण देवेंद्र फडणवीस मुख्यंमंत्री झाले त्याप्रमाणे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत शेवटच्या क्षणी संघटनेतील नेत्याला मुख्यमंत्रि‍पदासाठी पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांची सावध पावले

नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जेडीयूच्या नेत्यांकडून नितीश कुमार यांना मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार जाहीर करण्यात यावे, याची मागणी आत्तापासून करण्यात येत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचा वारस म्हणून त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना हळूहळू प्रोजेक्ट जेडीयुतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. निशांत कुमार यांनी देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT