Disha Salian Death Case : 'पैशाच्या नादी लागलेत, मुंबई महापालिका निवडणुकीमुळे 'टार्गेट''; पेडणेकरांचा सालियन कुटुंबावर गंभीर आरोप

Former Mumbai Mayor Kishori Pednekar Salian family court petition investigation Disha Salian death : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सालियन कुटुंबांवर गंभीर आरोप केले आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama
Published on
Updated on

Disha Salian Investigation : मुंबईतील दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, यासाठी तिच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून झाल्याचा गंभीर आरोप या याचिकेत केला आहे.

आम्ही नजरकैदेत होतो. त्यामुळे आम्ही न्याय मागू शकलो नाही, असे म्हणत शिवसेना नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा आमच्यावर दबाव होता, असा गंभीर आरोप याचिकेत केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळताना, 'सकाळ माध्यम समूह'च्या साम मराठी टीव्हीशी बोलताना सालियन कुटुंबांवर गंभीर आरोप केले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "सालियन कुटुंबांला मी एकदाच भेटले होते. तीन वर्षांपूर्वी त्यावेळी मी महापौर होते. त्यांनी बोलावले होते, म्हणून मी घरी गेले होते. त्यावेळी माझ्याबरोबर मीडियाचे प्रतिनिधी होते. तसेच शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्याशी माझी जास्त ओळख नाही."

Kishori Pednekar
MPSC Exam Pattern Change : 'MPSC' परीक्षेला आता 'UPSC' लूक; मुख्यमंत्री फडणवीसांचे आयोगाच्या पुनर्रचनेचे संकेत

दिशा सालियन कुटुंबांना आताच का जाग आली? पैशाच्या नादी लागले आहेत. तिच्या वडिलांना कोणाचे तरी सतत फोन यायचे. आम्हाला देखील मदत मागत होते. त्यांचा काही तरी वेगवेगळ्या चटणींचा व्यवसाय आहे. त्यासाठी ते मदतीची मागणी करत होते. त्यांनी तसे काही पत्र देखील दिले होते. पण आम्ही काही पैशांचा मदत केली नाही, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे.

Kishori Pednekar
Disha Salian Death Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; वडिलांची हायकोर्टात याचिका, ठाकरेंसह किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप

याचिकेमागे कोणीतरी

आताचे हे आरोप पैशांच्या नादी लागूच केलेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकी होणार आहे. त्यामुळे सर्व काही चालू आहे. एक आरोप करून झाला, आता दुसरा आरोप सुरू केला आहे. दुसरं काय? असा प्रश्न उपस्थित करत, सालियन कुटुंबांने दाखल केलेल्या याचिकेमागे कोणीतरी असल्याचा सांगण्याचा प्रयत्न किशोरी पेडणेकर यांनी केला.

म्हणून सालियन कुटुंबांची भेट

सालियन कुंटुंबांना दिशाभूल केल्याच्या आरोपांचे खंडण करताना, दिशाभूल म्हणजे काय? असा प्रतिप्रश्न किशोरी पेडणेकर यांनी केला. मी महापौर होते. त्यांच्या कुटुंबांबरोबर झालेल्या प्रसंगातून त्यांनी मला भेटायला बोलावले, मी मुंबईची महापौर म्हणून मी त्यांना एकदाच भेटल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला.

याचिकेत कोणावर आरोप

दिशा सालियन प्रकरणातील नव्या धक्कादायक घडामोडीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. दिशाचे वडील सतीश यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर,आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मारिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com