Eknath Shinde's Shiv Sena facing threat from Thackeray alliance Sarkarnama
विश्लेषण

BJP And Shiv Sena Alliance Trouble : उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका!

Uddhav Thackeray and Raj Thackeray Reunion Impact: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजकीय गणित बिघडली आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai civic polls and Thackeray Alliance: महायुतीने मुंबई कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा चंग बांधला आहे. भाजपने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठी टीम, तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून एकहाती मुंबई फिल्डिंग लावत आहे.

सध्या तरी मुंबईत भाजपपेक्षा एकनाथ शिंदे राजकीय गणित जुळवण्यात वेगानं पुढं जात असल्याचं दिसत आहे. परंतु उद्धव-राज युतीमुळे भाजपच्या गणिताला तडा, तर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय फिल्डिंगला धोका असल्याचा अंदाज विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

महायुती (Mahayuti) सरकारने राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना, हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला. यावरून राज्यात चांगलेच राजकीय रणकंदन झाले. राज ठाकरेंनी महायुती सरकारला धारेवर धरले, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन केली. यातून राज ठाकरेंनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक देताच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या आंदोलनात पहिली उडी घेतली. यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा जोर धरला.

मराठी विजय मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. तेव्हापासून ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चेने संपूर्ण राज्य व्यापले. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम मोठे झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या युतीमुळे भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) राजकीय गणितं फिस्कटली आहेत.

उद्धव-राज युतीमुळे सर्वाधिक भाजपने मुंबई महापालिकेसाठी आखलेल्या राजकीय गणितांना तडा जाऊ शकतो. भाजपला मराठीबहुल प्रभागांत जागावाटप करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. भाजपचा पारंपरिक हिंदीभाषिक मतदार हा ठाकरेंच्या भावनिक मोहिमेने प्रभावित होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

राज-उद्धव भेट सध्या, तरी भावनिक आणि कौटुंबिक वाटते, पण ‘आगामी काळ चांगलाच’ हे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य सहजपणे केलेले नाही. ही भेट भावनेपलीकडची राजकीय नांदी ठरू शकते. जर युती झाली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकच धक्का बसू शकतो अन् भाजपला नवी रणनीती आखावी लागेल. परंतु, ही खरी एकजूट ठरेल की क्षणिक भावना याचं उत्तर महापालिका निवडणुकीत मिळेल.

ठाकरे बंधूंची जवळीक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिकांचे पाठबळ, तर राज ठाकरेंकडे तरुण मराठी मतदार आहेत. ही युती मुंबईतील 40 टक्के मराठी मत एकवटू शकते. दादर, परळ, चेंबूरसारख्या भागांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘खरी शिवसेना कोणती?’ हा प्रश्न निवडणुकीत पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर त्यांचं ‘बाळासाहेबांचा खरा वारसा फक्त आहोत,’ अशा भावनिक लाटेचा फायदा या जोडीला होण्याची शक्यता आहे. याउलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तितकी भावनिक आपुलकी किंवा पारंपरिक वजन नाही.

एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप, मनसे हे सर्व पक्ष हिंदुत्वावर दावा करत आले आहेत. मात्र राज ठाकरे आधीपासून आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत. उद्धव ठाकरेही सध्या पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर हिंदुत्वाचे एक नवे शक्तिकेंद्र निर्माण होईल. याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्या खालोखाल भाजपला मुंबईत बसेल.

ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-एकनाथ शिंदे युतीला यामुळे मोठा फटका बसू शकतो. महापालिकेतील बरेचसे नगरसेवक सत्ता पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहे. आतापर्यंत 124 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. यात सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आहेत.

पण ठाकरे बंधू एकत्र आले, तर या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. काही जण ‘मूळ शिवसेने’कडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना अडचणीत सापडू शकते.

भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेना युतीमुळेच मागच्या वेळी मुंबईतील महापालिकेवर दावा केला गेला होता. पण ठाकरे बंधूंच्या युतीने भाजपचंही गणित ढासळू शकतं. भाजपला मराठीबहुल वॉर्डांमध्ये फटका बसू शकतो अन् त्यांच्या मराठी मतदारांचा टक्का कमी होऊ शकतो. त्यामुळे भाजप नवीन रणनीती आखण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT