Priyanka Tibrewal 

Sarkarnama

विश्लेषण

ममतांच्या विरोधात पराभूत होण्याचा फायदा! भाजप नेत्याला मिळालं मोठ बक्षीस

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात निवडणूक हरलेल्या प्रियांका टिबरेवाल (Pryianka Tibrewal) यांना या फेरबदलात बढती मिळाली आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपसह (B JP) काँग्रेस (Congress) आणि डाव्यांची (Left Parties) दाणादाण उडवली आहे. यानंतर भाजपने राज्य कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात निवडणूक हरलेल्या प्रियांका टिबरेवाल (Priyanka Tibrewal) यांना या फेरबदलात बढती मिळाली आहे.

भाजपने तडकाफडकी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाने नवीन राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. याचवेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सुकांत मुजुमदार यांनी सप्टेंबर महिन्यात स्वीकारल्यानंतर फेरबदल होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका निवडणुकीमुळे ते लांबणीवर पडले होते. अखेर महापालिका निवडुकीतील दारुण पराभवानंतर याला मुहूर्त मिळाला आहे.

प्रियांका टिबरेवाल यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात भवानीपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. ममता या नंदिग्राममधून पराभूत झाल्याने त्यांना भवानीपूरमधून निवडून येऊन विधानसभेवर जाणे आवश्यक होते. अन्यथा ममतांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले असते. याच टिबरेवाल यांच्यासाठी ममतांच्या विरोधात दिलेली ही लढत फायद्याची ठरली आहे. त्यांना आता चिटणीसपदी बढती मिळाली आहे.

राज्य कार्यकारिणीच्या पाच राज्य सरचिटणीसांपैकी खासदार लॉकेट चटर्जी आणि ज्योतिर्मय महातो या दोघांचे पद कायम राहिले आहे. अग्निमित्रा पॉल, दीपक बर्मन आणि जगन्नाथ चट्टोपाध्याय यांची आता सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.अग्निमित्रा पॉल यांच्या जागी तनुजा चक्रवर्ती यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

पक्षाचा लोकप्रिय चेहरा असलेले जयप्रकाश मुजुमजदार यांना उपाध्यपदावरून डच्चू देण्यात आला आहे. ते आता केवळ प्रवक्ते असतील. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी अली होसेन यांच्या जागी चार्ल्स नंदी यांनी निवड झाली आहे. खासदार सौमित्र खान यांच्याकडून राज्य भाजयुमोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. नव्या समित्यांमध्ये 12 राज्य चिटणीस आणि 11 उपाध्यक्ष आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT