आता पूर्वीचा भाजप राहिला नाही! आमदाराचा सात नगरसेवकांसह पक्षाला रामराम

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फोडाफोडीत आघाडीवर असलेल्या भाजपलाच (BJP) आता मोठा धक्का बसला आहे.
BJP MLa Carlos Almeida joins congress with seven corporators

BJP MLa Carlos Almeida joins congress with seven corporators

Sarkarnama

Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक पक्षांनी राजकीय फोडाफोडीला सुरवात केली आहे. यात आघाडीवर असलेल्या भाजपलाच आता मोठा धक्का बसला आहे. भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा यांनी पक्षाचा नगरसेवकांसह रामराम केला आहे. भाजप सोडताना त्यांनी पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.

गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) फोडाफोडीला जोर आला आहे. यात भाजपसह (BJP) तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी घेतली होती. आता काँग्रेसही मैदानात उतरली असून, भाजपला पहिला धक्का दिला आहे. भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा (Carlos Almeida) यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी भाजपच्या सात नगरसेवकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

या वेळी बोलताना अल्मेडा म्हणाले की, मी भाजपच्या अतिशय जवळ होतो. मनोहर पर्रीकर जिवंत असतानाच भाजप आता राहिला नाही. ते माझे गुरु होते. समर्थकांशी चर्चा करुन मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप सरकारच्या काळात बंदर शहर असलेल्या वास्कोचा विकास होत नसल्याने येथील जनतेत रोष आहे. काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षात प्रवेश करताना मला आनंद होत आहे.

<div class="paragraphs"><p>BJP MLa Carlos Almeida joins congress with seven corporators</p></div>
आता केवळ मजा बघा! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा

अल्मेडा हे दोन वेळा वास्को द गामा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पुढे केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये राहून सार्वजनिक जीवनात जनतेसाठी काम करणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आणखी आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर असून, ते लवकरच राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>BJP MLa Carlos Almeida joins congress with seven corporators</p></div>
कंगना राणावत पोचली थेट पोलीस ठाण्यात !

दरम्याना, भाजप नेत्या अलिना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला होता. अलिना यांनी त्यांच्या पती मथानी सलडान्हा यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. अखेर अलीना यांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या उपस्थितीत त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच आपमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बाहेर पडलेल्या त्या पहिल्या आमदार ठरल्या होत्या. तसेच त्यांच्या प्रवेशाने आपची ताकदही वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com