Mukta Tilak-Lakshman Jagtap
Mukta Tilak-Lakshman Jagtap Sarkarnama
विश्लेषण

Jagtap-Tilak News : दुर्धर आजारातही पक्षनिष्ठा शिकविणारे दोन झुंजार नेते भाजपने १२ दिवसांत गमावले

Vijaykumar Dudhale

पुणे : प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही पक्षनिष्ठा कशी जपावी, याचे तरुण राजकीय नेत्यांना दर्शन घडविणारे आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) हे दोन नेते भारतीय जनता पक्षाने (BJP) गमावले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या निधनाने पुणे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना, डॉक्टरांनी परवानी नाकाराहून या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत जाऊन मतदान केले होते, त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूचा भाजपला मोठा धक्का आहे. (BJP lost two struggling MLAs in 12 days)

दुर्धर आजाराशी झुंज देणारे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज (ता. ३ जानेवारी २०२३) खासगी रुग्णालयात निधन झाले. तत्पूर्वी कसब्याच्या (पुणे) आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या १२ दिवसांत आमदार जगताप यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना या दोघांनी पक्ष अडचणीत असताना ॲम्ब्युलन्समधून मुंबईला जाऊन विधान परिषद आणि राज्यसभेसाठी मतदान केले होते.

आमदार लक्ष्मण जगताप हे पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग चार वेळा निवडून आले होते. त्यानंतर जगताप यांनी राजकारणात मागे वळून कधी पाहिलेच नाही. पालिकेत त्यांनी महापौर, स्थायी समिती सभापती आदी पदावर काम केले होते. त्यानंतर अजित पवारांच्या मदतीतून त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पराभूत २००४ मध्ये विधान परिषद जिंकली होती. विधानसभेची २००९ ची निवडणूकही त्यांनी राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर जिंकली हाती. मात्र, मोदी लाटेत त्यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केला. त्यानंतर २००९ आणि २०१४ ची निवडणूक त्यांनी कमळ चिन्हावर जिंकली आणि पक्षनिष्ठा काय असते, ते दाखवून दिले. भाजपतही ते सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

याचदरम्यान त्यांना दुर्धर आजाराने गाठले. अगदी अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेण्यात आले. अमेरिकेहून उपचार करून आणल्यानंतर काही दिवसांनी लक्ष्मणभाऊंची प्रकृती सुधारली होती. मात्र, मुंबईपर्यंत प्रवास करणे धोक्याचे होते. मात्र, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत तो धोका पत्करून त्यांनी ॲम्ब्युलन्सने मुंबईला जाऊन मतदान केले होते. कारण, भाजप तेव्हा अटीतटीची लढाई लढत होता. डॉक्टर, भाजप नेते यांनी येऊ नका असे सांगितल्यानंतरसुद्धा ते मतदानासाठी मुंबईत पोचले आणि ज्या पक्षात जाईन त्यापक्षाशी एकनिष्ठ कसे राहायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले.

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक याही याचदरम्यान कर्करोगाशी दोन हात करत होत्या. त्या तर संघाच्या मुशीत घडलेल्या कार्यकर्त्या होत्या. पुणे महापालिकेत नगरसेवक, महापौर अशी पदे त्यांनीही भूषविली होती. भाजपच्या निष्ठावान म्हणूनच त्यांची ओळख होती. पण, अगोदरच दुर्धर आजार, त्यात प्रवासाला डॉक्टरांनी नाकारलेली परवानगी हे सर्व झुंगारून देऊन मक्ता टिळक यांनी राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी मुंबई गाठली हेाती. त्यांचेही २२ डिसेंबर रोजी निधन झाले.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील असे निष्ठावान दोन आमदार भाजपने अवघ्या बारा दिवसांत गमावले आहेत. त्यांच्या जाण्याने झालेले नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे या परिसरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT