Amit Shah, Narendra Modi, BJP Political strategy Sarkarnama
विश्लेषण

BJP Political strategy : CM पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यामागे मोदी-शहांची असते ही कुटनीती

Delhi CM Announcement Live Updates : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यंमत्री कोण, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दिल्लीच्या कुटनीतीचा अवलंब करून नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Rashmi Mane

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यंमत्री कोण, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश अशा काही राज्यांमध्ये मोदी-शहा या जोडीने धक्कातंत्राचा वापर करत भल्याभल्यांना चकवले. यामागे त्यांची रणनीती म्हणा की दुरदृष्टी की आणखी काही. पण त्यांची प्रत्येक निवड यशस्वी ठरली आहे. आता दिल्लीतही ते याच कुटनीतीचा अवलंब करून नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

प्रकाश झोतात नसलेला नवीन चेहऱ्यांना संधी

2014 पासून भाजपने 12 वेळा अत्यंत कमी प्रोफाइल, प्रकाश झोतात नसलेल्या नवीन चेहऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचे चार आणि नंतरचे एक यांचा समावेश आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेहमीच दाखवून देते की, कोणताही प्रादेशिक नेता पक्षापेक्षा मोठा नाही. याशिवाय, भाजपने मुख्यमंत्री बदललेल्या इतर राज्यांमध्ये हरियाणा, गोवा, कर्नाटक आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. आसाम आणि मध्य प्रदेशमधील निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे निवडले आहेत.

  1. हरियाणा - मनोहर लाल खट्टर गोवा,

  2. कर्नाटक- बसवराज बोम्मई

  3. त्रिपुरा - बिप्लब देब

  4. आसाम - बिस्वा शर्मा

  5. मध्य प्रदेश - मोहन यादव

  6. झारखंड - माजी मुख्यमंत्री रघुबर दास

  7. राजस्थान- भजन लाल शर्मा,

  8. छत्तीसगड- विष्णू देव साई,

  9. हरियाणातील- नायब सैनी

  10. ओडिसा - मोहन माझी

  11. गोवा - प्रमोद सावंत

  12. उत्तराखंडात- पुष्कर सिंह धामी

    सामान्य भाजप कार्यकर्ता देखील सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. ही या निवडींमागील कल्पना आहे.

केंद्रात जुन्या मुख्यमंत्र्यांना संधी देण्यात आली.

मुख्यमंत्री बदलल्यानंतर, यातील अनेक नेत्यांना केंद्राचा भाग बनवण्यात आले. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले शिवराज चौहान यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे देखील केंद्रीय मंत्री आहेत. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी निवडून आलेले अनेक नेते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत आणि ते लोकसभेत आहेत. अशा नेत्यांमध्ये हरियाणात मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडात त्रिवेंद्र रावत, कर्नाटकात बसवराज बोम्मई, त्रिपुरात बिप्लब देब यांचा समावेश आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT