Congress-BJP Sarkarnama
विश्लेषण

काँग्रेसला सहा पक्ष सोबत घेऊन जे जमलं नाही ते एकट्या भाजपनं करुन दाखवलं

मणिपूर विधानसभा निवडणुकीचे हाती येत असून, सत्ताधारी भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) हाती येत असून, सत्ताधारी भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने 60 पैकी 29 जागांवर आघाडी घेतली असून तो आता बहुमताच्या जवळ आला आहे. याचवेळी काँग्रेस आघाडीने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने सहा पक्षांना सोबत घेतले पण इतर पक्षांशी आघाडी न करता एकला चलो रे ही भूमिकाच आता भाजपला फायद्याची ठरल्याचे दिसत आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. आता हाती आलेल्या निकालानुसार, भाजप हा 29 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 3 जागांवर तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 9, संयुक्त जनता दल 3 आणि नागा पीपल्स फ्रंट 4 जागांवर आघाडीवर आहेत.

मणिपूर पक्षनिहाय जागा

भाजप -29

काँग्रेस - 3

नॅशनल पीपल्स पार्टी – 9

संयुक्त जनता दल – 3

नागा पीपल्स फ्रंट – 4

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह हे 18 हजार मतांनी हेनगांग मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपने इतर स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता काबीज केली होती आणि बिरेनसिंह हे मुख्यमंत्री झाले होते. मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. यातील पहिला टप्पा 28 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा 5 मार्चला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला होता. शहांसोबत भाजपचे बडे नेतेही मणिपूरमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT