विधानसभा निकालादिवशीच निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

देशातील पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे (Assembly Election) निकाल जाहीर होत आहेत.
VIctory procession |Election Commission news | Assembly Election result news
VIctory procession |Election Commission news | Assembly Election result news Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे (Assembly Election) निकाल जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे निवडणूक आयोगाने विजयी मिरवणुंकावर पूर्णपणे बंदी घातली होती. आता सर्व प्रकारच्या विजयी मिरवणुकांना आयोगाने परवानगी दिली आहे.(Election Commission news today)

आयोगाने म्हटले आहे की, कोरोना महामारीचा विचार करून सर्व प्रकारच्या विजयी मिरवणुकांवर बंदी घातलण्यात आली होती. आता ही बंदी मागे घेण्यात आली आहे. यामुळे विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येतील. मात्र, प्रत्येक जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांनुसारच या मिरवणुका काढाव्या लागतील. तसेच, सर्व नियमांचे पालनही या मिरवणुका काढताना करावे लागेल.

VIctory procession |Election Commission news | Assembly Election result news
भाजपला धक्का! सर्वाधिक जागा पण बहुमतापासून दूरच

कोरोनाचा (Covid-19) कहर सुरू असतानाही निवडणूक आयोगाने (Election Commission) नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याची भूमिका घेतली होती. यासाठी आयोगाने सर्व प्रकारच्या प्रचार सभांवर काही काळ बंदी घातली होती. देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने चिंता व्यक्त होत होती. यामुळे आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला हो.. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांनी पदत्राया, रॅली, रोड शो, सायकल आणि बाईक रॅलींवर काही काळ बंदी घातली होती. (Assembly election result news)

यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परंतु, आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे ठरवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com