India's nuclear response policy : जगातील काही देशांकडेच अणूबॉम्ब आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचाही समावेश होतो. या दोन्ही देशांमधील संबंध अनेक दशकांपासून तणापूर्ण आहेत. इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत दोन तुकड्यांमध्ये विभागला गेला आणि नवीन देश पाकिस्तान बनला.
भारत आणि पाकिस्तान दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत, मात्र दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झाले आहे. ज्यातील बहुतांश युद्ध हे काश्मीर मुद्य्यावरूना झाले आहे. ज्यावर दोन्ही देशांकडून आपला सांगितला जात आहे. आता सध्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा दोन्ही देशात टोकाचा तणाव निर्माण झाला, असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही अणुहल्ल्याच्या धमकी देवून परिस्थिती आणखी चिघळवल्याचे दिसत आहे.
तर अशावेळी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न स्वाभाविकच येतो की, खरंच पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो का? भारत आणि पाकिस्तानमध्ये Non-Nuclear Aggression Agreement झाले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांनी करार केला आहे की, दोन्ही देश अणवस्त्रांचा वापर करणार नाहीत.
२१ डिसेंबर १९८८ रोजी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टो आणि पंतप्रधान राजीव गांधी यांनी अणवस्त्रविरोधी करारावर स्वाक्षरी केली. या करारास २७ जानेवारी १९९१ रोजी भारत आणि पाकिस्तानच्या संसदेने मंजूरी दिली.
Non-Nuclear Aggression Agreement अंतर्गत भारत आणि पाकिस्तान प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या एक जानेवारीस करार अंतर्गत येणारी अणु प्रतिष्ठापना आणि सुविधांबाबत एकमेकांना सूचित करावे लागेल. या कराराचा मुख्य उद्देश आहे की, दोन्ही देशांमधील अणुहल्ल्यांची भीती नष्ट करणे आणि धोरणात्मक स्थिरता कायम राखणे.
यानंतर भारताने १९९९मध्ये NFU(नो फर्स्ट यूज) धोरणाची घोषणा केली होती, ज्यामध्ये भारताने म्हटले होते की तो कधीही कोणत्याच देशावर आधी अणुहल्ला करणार नाही. भारताने हा संदेश दिला की तो अणु हल्ल्याचा वापर केवळ आत्मरक्षणासाठी करेल आणि तोही तेव्हाच जेव्हा भारतावर अणुहल्ला होईल.
कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस नुसार पाकिस्तानने NFU धोरणाचा स्पष्टपणे अस्वीकार केला. याचा अर्थ असा की पाकिस्तान गरज पडल्यास कधीही कोणत्याही देशाविरोधात अणवस्त्राचा वापर करू शकतो. मात्र Non-Nuclear Aggression Agreement नंतर जर भारताविरोधात पाकिस्तानने अणवस्त्राचा वापर केला, तर त्यांना केवळ भारताच्या प्रत्युत्तराचाच सामना करावा लागणार नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो एकाकी पडेल हे निश्चित.
भारत १९७४मध्ये अणुशक्ती असलेला देश बनला, तर पाकिस्तान १९८८मध्ये अणुशक्ती देश बनला. भारत और पाकिस्तान के पास कितने परमाणु हथियार ucs.org नुसार भारताकडे जवळपास १६४ अणवस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे जवळपास १७० वॉरहेड आहेत.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक छोटासा अणुहल्ला देखील किमान एका आठवड्यात २ कोटी लोकांचा मृत्यू होवू शकतो आणि जर अणुहल्ला झाला तर तो विकसनशील देशांमध्ये जवळपास दोन अब्ज लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू होवू शकतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.