
Pakistan’s Demands and China's Response : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेणं सुरू केलं आहे. ज्यामुळे पाकिस्तान प्रचंड धास्तावलेला दिसत आहे. शिवाय, जगभरातूनही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला असून, अनेक प्रमुख देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे. दरम्यान, आता पाकिस्तानच्या मदतीस अपेक्षेप्रमाणे चीन आलेला दिसत आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी दिखावा करण्यापुरती तरी मागणी पाकिस्तानने केलेली आहे, तर पाकिस्तानच्या या मागणीला आता चीनने समर्थन दिले आहे.
चीनी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्ता्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तननचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान चीनने सांगितले की, ते दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर लक्ष ठेवून आहेत.्रचे परराष्ट्रमत्रीेला असून, अक
चर्चेदरम्यान इशाक दार यांनी म्हटले की, ते दहशतवादाविरोधात कठोरातील कठोर निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध आहेत आणि पाकिस्तान तणाव वाढवणाऱ्या कोणत्याही पावलाचा विरोध करतो आहे. पाकिस्तान चीन आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत या मुद्याबाबत संपर्कात राहील.
तर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले की, पाकिस्तानच्यावतीने दहशतवादाविरोधात घेतल्या गेलेल्या निर्णयांचे समर्थन आम्ही करतो. दहशतवादाविरोधातील लढाई सर्व देशांची सामूहिक जबाबदारी आहे.
पाकिस्तानची मागणी होती की पहलगाम हल्ल्याच्या तपासात रशिया आणि चीनला समाविष्ट केले जावे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय टीमने तपास करावा की भारताचे पंतप्रधान खरं बोलत आहेत की खोटं?
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.