नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत पेट्रोल व डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर गगनाला भिडले आहेत. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. यातून मोदी सरकारनं बक्कळ कमाई केल्याचे समोर आले आहे. इंधनावरील करातून सरकारला मागील तीन वर्षात 8 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनीच मंगळवारी संसदेत ही माहिती दिली आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अबकारी करात कपात केली आहे. पण त्याआधीच सरकारने या करातून मोठी कमाई केली आहे. तीन वर्षात केंद्र सरकारला पेट्रोट व डिझेलवरील करातून मिळालेल्या एकूण उत्पन्नापैकी 3.71 लाख कोटी रुपये 2020-21 या एका वर्षात मिळाले आहेत. सरकारने ता. 5 ऑक्टोबर 2018 रोजी पेट्रोलवरील कर प्रति लिटर 19.48 रुपयांवरून 27.90 रुपये नेला आहे. डिझेलवरील सध्याचा कर 21.80 रुपये एवढा आहे. हा कर आदी 15.33 रुपये एवढा होता.
या कालावधीमध्ये करामध्ये अनेकदा वाढही करण्यात आली. ता. 2 फेब्रुवारी 2021 रोजी पेट्रोलवरील कर प्रति लिटर 32.98 रुपये आणि डिझेलवरील कर प्रति लिटर 31.83 रुपये एवढा होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी त्यामध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे देशभरातील इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाले. अनेक राज्य सरकारांनीही त्यानंतर कर कमी करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
या करातून सरकारला 2028-19 मध्ये 2 लाख 10 हजार 282 कोटी, 2019-20 मध्ये 2 लाख 19 हजार 750 कोटी तर 2020-21 मध्ये 3 लाख 71 हजार 908 कोटी रुपये मिळाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. दिवाळीआधीच सरकारने पेट्रोलवरी कर 5 रुपयांनी तर डिझेलवरील कर 10 रुपयांनी कमी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.