Mumbai News : महायुती सरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीनही मित्रपक्षांमध्ये कुरघो़डीचं राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे.मंत्र्यांच्या पीए,ओसडी यांच्या नियुक्तीवरुन राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 109 पीए ओएसडी यांची नियुक्ती करण्यात आली असून 16 फिक्सर जणांच्या नियुक्तीला विरोध केल्याचेही स्पष्ट केले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चक्क महाविकास आघाडीच्या दोन 'चर्चे'तील नेत्यांना पीए गिफ्ट केले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.त्यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएमचा मुद्दा पेटवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी गेल्या काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुसर्यांदा भेट घेतली आहे. तसेच त्यांनी शनिवारी(ता.1 मार्च)एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.
या दोन्ही नेत्यांच्या राजकीय हालचाली वाढल्या असल्याचं दिसून येत आहे.हे दोन्ही नेते शरद पवारांच्याच पक्षाचेच असल्यानं त्यांनाच सरकारी पीए देण्यामागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारची काही विशेष रणनीती आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. यात जयंत पाटलांच्या विधानसभा निवडणुकीतील नंतर बदलेल्या बॉडी लँग्वेज आणि भाजप नेत्यांशी वाढती जवळीक यावरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. तर ज्या उत्तम जानकरांनीही (Uttam Jankar) सुरुवातीला अजित पवारांच्या विजयावरच शंका घेत त्यांच्यावर तिखट भाषेत टीका केली.
एकवेळ तर त्यांच्या आक्रमक ईव्हीएम विरोधातलं आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. पण आता त्यांचं आंदोलनही बोथट झाल्याचं दिसून येत आहे. अशातच त्यांची अजित पवारांशी वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.
आधीच पक्षात नाराज असल्याच्या चर्चा अन् त्यातभर म्हणजे जयंत पाटलांनी तर चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊन काही दिवस होत नाही तोच,सत्ता राजकारणासाठी महत्त्वाचे असते समोर गोड ताट मांडून ठेवले आणि दरवाजा उघडा ठेवून बोलत आहेत तर किती लोक थांबतील याविषयी शंका आहे , महाविकास आघाडीची घडी बसणं कठीण आहे अशी कबुलीच दिली.तसेच त्यांनी आमच्या पार्टीतील अनेक जण पक्ष सोडून जातील, असं त्यांनी सांगितलं यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मनात सुरू असलेल्या चर्चांना हवा मिळाली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर वारे उलटे फिरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या अनेक नेतेमंडळी पुन्हा महायुतीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत.
महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचवेळी आता शरद पवारांच्या दोन बड्या नेत्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे.त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरु होणार आहे.तसेच राज्याचा अर्थसंकल्प 10 तारखेला मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या मुद्द्यांवरूनही राजकारण तापण्याची शक्यता आहे.
या दोन्ही मुद्द्यांवरुन सभागृहात सत्ताधारी महायुती सरकारला घेरण्याची जबाबदारी जयंत पाटील अन् त्यांच्या जोडीला उत्तमराव जानकर यांच्यावर असण्याची शक्यता आहे.त्याचमुळे सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधी बाकावरील दोन प्रमुख नेत्यांनाच पीए देण्याची घोषणा करुन देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.तरीदेखील पीए देण्यामागे भाजप तसेच महायुती सरकारची भविष्यातील 'विशेष' रणनीतीही असण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.