<div class="paragraphs"><p>BJP and Congress </p></div>

BJP and Congress

 

Sarkarnama

विश्लेषण

काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड! सहाच दिवसांत आमदाराची घरवापसी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) भाजपने ((BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपने काँग्रेसचे (Congress) आमदार बलविंदरसिंग लड्डी (Balwinder Singh Laddi) यांना सहा दिवसांपूर्वी फोडले होते. परंतु, काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत पुन्हा त्यांची घरवापरसी केली आहे. यावरून पंजाबमधील वातावरण तापले आहे.

काँग्रेसचे तीन आमदार सहा दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. यामुळे सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. यात फतेहसिंग बाजवा, बलविंदरसिंग लड्डी आणि राणा गुरमित सोधी या तीन आमदारांचा समावेश आहेत. फतेहसिंग बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांचे बंधू आहेत. काँग्रेसने आता भाजपला धक्का देत लड्डी यांना पुन्हा आपल्याकडे ओढून घेतले आहे.

लड्डी यांनी काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत पक्षात घरवापसी केली. लड्डी हे हरगोविंदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. लड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागताचे संदेश सोशल मीडियावर अजूनही येत आहेत. हे संदेश थांबण्याआधी लड्डी हे काँग्रेसमध्ये परतले आहेत. ते परतल्याने राज्यातील भाजप तोंडावर पडल्याचे चित्र आहे.

याचबरोबर अकाली दलाचे माजी आमदार गुरतेजसिंग गुढियानी, युनायटेड अकाली दलाचे माजी खासदार राजदेवसिंग खालसा आणि पंजाब-हरयाना उच्च न्यायालयातील वकील मधुमित यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात केवळ तीनच आमदार असलेल्या भाजपची ताकद यामुळे वाढली आहे.

राज्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीच्या ताब्यात सत्ता काबीज केली होती. हे दोन्ही पक्ष सलग 10 वर्षे राज्यात सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT