धक्कादायक : पुण्यात पोलिसानेच दिली दुसऱ्या पोलिसाला मारण्याची सुपारी

पुण्यात एका पोलिसाने (Police) दुसऱ्या पोलिसाला मारण्याची सुपारी गुन्हेगाराला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Police 

Police 

Sarkarnama

पुणे : पुण्यात (Pune) एका पोलिसाने (Police) दुसऱ्या पोलिसाला मारण्याची सुपारी गुन्हेगाराला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांला ठार मारण्याची सुपारी एका सराईत गुन्हेगाराला दिली होती. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात (Pune Police) मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला अटक केली असली तरी सुपारी देणारा पोलीस कर्मचारी फरार झाला आहे.

सुपारी देणारा पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याचा शोध पोलीस घेत आहेत. सुपारी घेणारा सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ हा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात अंमलदार नितीन दुधाळ आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यातील दिनेश दोरगे हे दोघे कार्यरत आहेत. ते दोघे अनेक वर्षांपासून मित्र आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊ अखेर नितीन दुधाळने सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ याला दिनेश दोरगे यांना ठार मारण्याची सुपारी दिली.

<div class="paragraphs"><p>Police&nbsp;</p></div>
बॉलीवूडला कोरोनाचा विळखा! नोरापाठोपाठ मृणाल 'पॉझिटिव्ह'

योगेश अडसूळने सुपारी घेतल्यानंतर अनेकवेळा पोलीस कर्मचारी दोरगे यांचा पाठलाग केला. तो दोरगे यांना ठार मारण्याचा कट आखत होता. आपला पाठलागी होत असल्याचे दोरगे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी योगेश अडसूळला ताब्यात घेतले. यानंतर चौकशीत अडसूळने हा सगळा कट उघड केला. फरासखाना पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन दुधाळ यानेच दोरगे यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याचे कबूल केले.

<div class="paragraphs"><p>Police&nbsp;</p></div>
सावधान! महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या तिसऱ्या आठवड्यात दोन लाखांवर जाणार

पोलिसानेच दुसऱ्या पोलिसाला ठार मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार अडसूळ आणि पोलीस अंमलदार दुधाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडसूळ पकडला गेल्याचे कळताच दुधाळ हा फरार झाला आहे. पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com