Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Sarkarnama
विश्लेषण

Congress News : दिल्लीत काँग्रेसचे पाणीपत; पहिल्याच निवडणुकीत खर्गेंना धक्का

Ganesh Thombare

Congress News : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये दिल्ली महापालिकेवर आपने झेंडा फडकावला आहे. २५० पैकी १३४ जागांवर आपने दणदणीत विजय मिळवला. तर भाजपने १०४ जागा मिळवल्या. मात्र, काँग्रेसला फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले. एकेकाळी दिल्ली गाजवलेल्या काँग्रेसला फक्त ९ जागांवर विजय मिळवता आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली महापालिका भाजपकडून हिसकावून घेत 'आप'ने बाजी मारली. मात्र, नवीन असलेल्या पक्षाने एवढ्या कमी काळात दोन राज्य आणि एक महापालिका ताब्यात घेतल्यामुळे सध्या 'आप'चा देशात गवगवा निर्माण झाला आहे. तर एकीकडे 'आप'चा गवगवा आणि दुसरीकडे देशभरात भाजप (BJP) झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, देशावर अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसची परिस्थिती सध्या मात्र दयनिय झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जवळपास ३० जागांवर विजय मिळाला होता. पण या निवडणुकीमध्ये तर फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसवर अशी वेळ का आली? हा चर्चेचा विषय होऊ शकतो. एकेकाळी दिल्ली ही काँग्रेसचा बालेकील्ला होती. एवढंच नाही तर दिल्लीत काँग्रेसच्या शिला दिक्षीत या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या निधनानंतर मात्र काँग्रेसला म्हणाव तसं यश दिल्लीत मिळालं नाही. २०१३ नंतर दिल्लीत आपची सत्ता आली आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मुख्यमंत्री झाले.

एकेकाळी काँग्रेस (congress) हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होता. मात्र, सध्या काँग्रेसच्या अवस्थेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आताच काही दिवसांपूर्वी गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका पार पडल्या. मात्र काही एक्झीट पोल नुसार गुजरातमध्ये देखील काँग्रेसला फटका बसत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेमध्येही काँग्रेसला फक्त ९ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे काँग्रेससाठी ही चितंनाची बाब आहे.

दिल्लीवर राज्य करणारा पक्ष आता मात्र आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसतोय. सध्या काँग्रेसने पक्ष वाढीसाठी अनेक मोठे निर्णय देखील घेतले. त्यामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा केला. अर्थात मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी देशातील अनेक राज्यात 'भारत जोडो' यात्रा काढली. या यात्रेला चांगला प्रतीसादही मिळाला. पण याचा फायदा दिल्ली निवडणुकीमध्ये झालेला दिसत नाही.

दिल्लीत काँग्रेसवर अशी वेळ का आली? :

देशात अनेक वर्ष काँग्रेसचं (Congress) सरकार होतं. तसंच दिल्लीत देखील २०१३ च्या आधी काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यानंतर काँग्रेसला दिल्लीत फार चुनूक दाखवता आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नेहमी काँग्रेसवर अशी वेळ का आली? असा सवाल उपस्थित केला जातो. असही म्हटलं जातं की या सर्व परिस्थितीला काँग्रेसची हायकमांड तर जबाबदार नाही ना? कारण काँग्रेसचे वरिष्ट नेते हे दिल्लीत असतात. तरीही दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत फक्त ९ जांगावर समाधान मानावं लागणं हे दुर्देवाची बाब आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणारं नाही.

भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) बहुमत मिळालं आहे. तर दिल्ली महापालिकेतील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आप, भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली. यामध्ये आपने बाजी मारत बहुमत मिळवलं. दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबरला मतदान झालं होतं. त्यानंतर आज ७ डिसेंबरला मतमोजणी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT