Devendra Fadnavis-Jayant Patil-nilam gorhe Sarkarnama
विश्लेषण

Vidhan Parishad News : ‘कोर्ट नको, ते सोपं आहे, तुम्हाला’; नीलम गोऱ्हेंच्या सभापतिपदावरून फडणवीस-जयंत पाटील भिडले

Pavsali Adhiveshan 2023: 'भाई, मंत्री परिचयानंतर.... नवीन मंत्री आल्यानंतर मंत्र्यांच्या परिचयाशिवाय सभागृह चालू शकत नाही'

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : विधान परिषदेचे कामकाज आक्षेपानेच सुरू झाले, तेही नीलम गोऱ्हे यांच्या सभापतीपदावरून. राष्ट्रगीत आणि गर्जा महाराष्ट्र गीत संपताच सभापती गोऱ्हे मंत्री परिचयाची घोषणा केली. तेवढ्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी माझा कामकाजावरच आक्षेप घेतला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री परिचयानंतर भाई, असे सांगून थांबविण्याचा प्रयत्न झाला. गोऱ्हे यांच्या सभापत्रिपदावरून मात्र पहिल्या दिवशी जयंत पाटील आणि फडणवीस एकमेकांना भिडले. (Devendra Fadnavis-Jayant Patil face to face over Nilam Gorhe's chairmanship)

नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्या आहेत. त्यावर आक्षेप घेत शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाराष्ट्र गीत संपताच माझा कामकाजावरच आक्षेप आहे, असे म्हणत बोलायला उभे राहले. पण, उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘भाई, मंत्री परिचयानंतर.... नवीन मंत्री आल्यानंतर मंत्र्यांच्या परिचयाशिवाय सभागृह चालू शकत नाही,’ असे म्हणत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते गोंधळातही बोलतच राहिले.

त्यातच फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मात्र जयंत पाटील उभे राहत ‘ज्यावेळी नीलम गोऱ्हे सभापतीपदावर बसल्या, त्यावेळी त्यांना कुठलाही पक्ष नसतो. त्यांचं पक्ष सदस्यत्व आपोआप जातं. हे विधीमंडळाच्या नियमात आहे. तेवढ्यात सत्ताधारी बाजूवरील आमदाराने ‘जयंत पाटील तुम्ही कोर्टात जा,’ असे सांगितले. त्यावर कोर्ट तुम्हाला सोपं आहे, त्यामुळे कोर्टात नको, असे हसत सांगून नकार दिला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पॉईंट ऑफ आर्डर मांडत असे कधीही, कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे नियम आहेत. आपल्या या निमयांच्या पुस्तिकेने काही नियम तयार केले आहेत. नियमानुसार नोटीस द्यावी लागते. नोटिशीनंतर नियमांत बसत असेल तर आक्षेप घेता येतो. हा आक्षेप कुठल्याही नियमांत बसत नाही. त्यामुळे सभापतींना माझी विनंती आहे की शोकप्रस्तावासारखा महत्वाचा विषय असताना असे नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही. त्यामुळे नोटीस न देता असा आक्षेप घेता येणार नाही, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT