Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांना बढती मिळाली आहे. विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून माने यांच्या नियुक्तीची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. (MLA Yashwant Mane promoted; Appointed to this post)
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. १७ जुलै) मुंबईत सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून देत कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पावसाची सद्यस्थिती मांडली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी महाराष्ट्र अधिनियम आठच्या पोटनियम एक अन्वये तालिका अध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी शिंदे गटाचे संजय शिरसाट, भाजपचे हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, अजित पवार गटाचे यशवंत माने (yashwant Mane) आणि काँग्रेसचे रिसोडचे आमदार अमित झनक या चौघांचा समावेश आहे. त्यात संजय शिरसाट यांनी यापूर्वीही तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी मानेंची ओळख आहे. कारण, यापूर्वी ते इंदापूर बाजार समितीचे उपसभापती होते. आमदार होण्यापूर्वी त्यांची राजकीय वाटचाल ही इंदापूर तालुक्यातच झाली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमदार यशवंत माने यांनी घेतला होता. त्याचे फळ त्यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मिळाले आहे. पहिल्या तासाभरातच विधानसभा अध्यक्षांनी नव्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली आहे. त्यात अजित पवार गोटातून आमदार माने यांना संधी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.