Kunal Patil
Kunal Patil Sarkarnama
विश्लेषण

Dhule Lok Sabha 2024: पाटील विरुद्ध पाटील सामना रंगणार? धुळे लोकसभेसाठी उमेदवार कोण?

सरकारनामा ब्यूरों

Dhule: धुळे लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याचे काँग्रेसकडून निश्चित झाले आहे. काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा आहे. यात आमदार कुणाल पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे कुणाल पाटील यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, असा प्रश्न धुळे लोकसभा मतदारसंघात विचारला जात आहे.

धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. धुळ्यात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना पक्षाने उमेवारी देण्यास नकार दिल्याचे बोलले जाते. कुणाल पाटील भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. माजी आमदार शरद पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कुणाल पाटील यांना भाजपकडून उमेदवारीसाठी गळ घातली जात असल्याच्याही चर्चा आहे.

आमदार कुणाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून शरद पाटील उमेदवारी करतील असेच सध्याचे चित्र आहे, असे झाले तर निवडणुकीमध्ये पाटील विरुद्ध पाटील असाच सामना धुळेकरांना बघावयास मिळू शकतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळ्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला कुणाल पाटलांनी दांडी मारली होती. त्यामुळे कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

भाजप धुळे लोकसभेसाठी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रणीनिती आखली जात आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर सुतगिरणीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांची छापेमारी झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी विचारणा झाली परंतु, कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक आपण लढणार नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठांना सांगितले आहे.

धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजपतर्फे मोठी रणनीती आखण्यात आली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, यावेळी धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजप काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढवली होती, त्यावेळी देखील भाजप समोर आमदार कुणाल पाटील हे मोठं आव्हान होतं, परंतु आता आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे सांगितल्यानंतर आता कोण उमेदवार असा मोठा प्रश्न काँग्रेससमोर उपस्थित झाला आहे.

धुळे लोकसभेवर दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. सुभाष भामरे हे सलग दोन वेळा धुळे लोकसभेवर निवडून आले आहेत, परंतु यावेळी मात्र त्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह दिसत नाही. पण भामरे यांनी पक्षश्रेष्ठींवर त्याचबरोबर आपल्या कामावर तसेच जनतेवर आपला विश्वास असल्याचे मत व्यक्त केलं आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही भामरे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT