Karad Vs Deshmukh: 'बा विठ्ठला' श्रेयवादी नेत्यांना माफ कर; एकाच पुलाचे दोनदा उद्धघाटन, जनतेची करमणूक!

Rena River Bridge Inauguration: आमदार रमेश कराड व आमदार धिरज देशमुख यांनी उद्घाटनाचे स्वतंत्र कार्यक्रम घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
Karad Vs Deshmukh:
Karad Vs Deshmukh:Sarkarnama

सुधाकर दहिफळे

Renapur: आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्धघाटन करण्याचा सपाटा लावला आहे. श्रेयवादावरुन नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. याचा प्रत्यय नुकताच रेणा नदीवरील पुलाच्या लोकार्पण समारंभात आला. आमदार रमेश कराड (MLA Ramesh Karad) व आमदार धिरज देशमुख (MLA Dhiraj Deshmukh) यांनी उद्घाटनाचे स्वतंत्र कार्यक्रम घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. नेत्यांच्या या जुगलबंदीतून तालुक्यातील जनतेची मात्र करमणूक झाली!

तालुक्यात काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख व भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यात शासकीय निधी कोणी आणला यावरुन श्रेय घेण्याची तीव्र स्पर्धा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा निधी माझ्याच प्रयत्नामुळे आला, असा दावा दोन्ही आमदार करीत आहेत.

रेणा नदीवर रेणापूर मधून घनसरगावकडे जाण्याच्या रस्त्यावर शासकीय निधीतून पुलाचे काम करण्यात आले आहे. यासाठी दोन कोटी रुपयाचा खर्च झाला आहे. या पुलाचे काम पुर्ण होताच 6 मार्च रोजी आमदार कराड यांच्या हस्ते घनसरगावच्या सरपंच , उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यापाठोपाठ दोनच दिवसांनी 8 मार्च रोजी आमदार देशमुख यांनी घनसरगावच्या सेवा संस्थेच्या अध्यक्षाना सोबत घेऊन दुसऱ्यांदा याच पुलाचे उद्घाटन केले.

Karad Vs Deshmukh:
Eknath Shinde: जिल्हाधिकाऱ्यांसाठी गुड न्यूज: मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

रेणापूर तालुका मागासलेला आहे.ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. पानगाव ते खरोळाफाटा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्यायला पाणी मिळत नसल्यामुळे पशुधनाची विक्री वाढली आहे. बेरोजगारीमुळे मजुर व युवकांचे स्थलांतर होत आहे. शेतक-यांना पीक विमा मिळाला नाही. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी अद्याप कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अशा बिकट काळात जनतेला मदत करण्याऐवजी काँग्रेस व भाजपाचे नेते एसी गाडीमधून येऊन आयत्या व पुर्ण झालेल्या कामाचे श्रेय घेऊ पाहात आहेत.नेत्यांचा खालावलेला स्तर व लोकामधील स्थान घसरल्याने हे घडत आहे , याची तालुक्यात चर्चा आहे.

Karad Vs Deshmukh:
Karad Vs Deshmukh:Sarkarnama

रस्ता करण्याची सदबुद्धी दे

काँग्रेस व भाजप नेत्यांच्या फुकट श्रेय घेण्याच्या लढाईतून पानगावचे विठ्ठल रुक्मीणी मंदीरही सुटले नाही. ११ व्या शतकातील पुरातन मंदीराच्या विकासासाठी शासनाच्या निधीतून ९ कोटी ३६ लाख रुपये मंजुर झाले आहेत. सदरचा निधी आम्हीच आणल्याचा दावा करत काँग्रेस व भाजपाचे आमदार ग्रामस्थाकडून सत्कार घेत आहेत. पानगाव ते खरोळाफाटा या रखडलेल्या रस्त्याची मागणी करणारे नागरीक 'बा विठ्ठला' या श्रेयवादी नेत्यांना माफ कर व रस्ता करण्याची सदबुद्धी दे " अशी प्रार्थना करीत आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com