Mumbai News : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक तथा सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. ती आत्महत्याच होती अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यामुळे न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली आहे. यामुळे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या राणे पिता-पुत्रांना पुन्हा एकदा तोंडावर पडावे लागले आहे. मंत्री नितेश राणेतर दुसऱ्यांदा तोंडावर पडल्याने त्यांचाच पक्षाने त्यांचा पोपट केला अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
दिशा सालियन हिचा 9 जून 2020 रोजी मालाड येथील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोलिस तपासात याला आत्महत्या असे सांगण्यात आले होते. पण ती आत्महत्या नव्हती, तिचा लैंगिक छळ करून हत्या करण्यात आली असा धक्कादायक दावा दिशाच्या वडिलांनी केला होता. तसेच या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या प्रकरणाची नव्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआयकडून करावी अशी मागणी केली होती. पण आता 2023 मध्ये तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त्य केलेल्या एसआयटीचा अहवाल समोर आला आहे. याच अहवालावरून आदित्य ठाकरेंना क्लीन चीट देण्यात आली आहे.
याच मुद्द्यावरून अनेकदा माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना घेरलं होतं. 2020 पासून आतापर्यंत अनेकदा याची चर्चा लावून धरली होती. पण आता दिशाच्या वडिलांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वक्तव्यांमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. तरिही महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मुलाचे कारनामे लपवण्यासाठीच सर्व अहवाल किंवा तपासात हस्तक्षेप केल्याचा दावा केला होता. पण आता 2023 मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीसह मालवणी पोलिसांकडून याबाबत अहवाल कोर्टाकडे गेला आहे. ज्यातून धक्कादायक दिशाने आत्महत्या केल्याचेच म्हटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे तोंडावर पडले आहेत.
दरम्यान नितेश राणे याआधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यामुळे देखील तोंडावर पडले होते. बडगुजर यांचा वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश झाला. पण त्यांच्या प्रवेशामुळे त्यांना तोंड लपविण्याची किंवा सारवासारव करण्याची वेळ आली. बडगुजर यांच्यांवर भारतीय जनता पक्षाने गंभीर आरोप केले होते. ज्यात निलेश राणे अग्रभागी होते. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षा झालेला सलीम कुत्ता या आरोपी सोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केली, असे बोलत रान उठवले होते. तर पार्टीची छायाचित्रे नितेश राणे यांनी थेट विधानसभेत झळकवली होती. हा दारूगोळा त्यांना सिडकोतीलच भाजपच्या काही नेत्यांनी पुरवला होता. त्यावर विधिमंडळात गोंधळ देखील झाला होता.
तसेच मंत्री राणे यांनी सुधाकर बडगुजर हे देशद्रोही असल्याचा आरोपही केला होता. तर त्यांच्या या आरोपानंतर भाजपच्या अन्य एका नेत्याने विशेष एसआयटी नियुक्त करून चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. पण आता हेच विविध गंभीर आरोप असणारे श्री बडगुजर भाजप वासी झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नितेश राणे यांना कोंडीत पकडताना त्यांचा पोपट झाला, अशी शेलक्या शब्दात टीका केली होती.
आता याच क्लिन चिटरून खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणेंवर जोरादर टीका केली आहे. राऊत यांनी, आता फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. तर नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागणार का? असा टोलाही नितेश राणेंवर हल्लाबोल करताना लगावला.
दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिन चिट रिपोर्ट आला आहे. पोलिस, एसआयटी आमचे नाहीत, ते तुमचे आणि एसआयटीही तुमचीच. पण आता आता सत्य समोर आलं असून हे फक्त नेतृत्व खच्ची करण्यासाठी केलं. आता काय करणार आहात? सर्वात आधी फडणवीस यांनी माफी मागावी. तर तो जो राणेंचा मुलगा, जो एवढा एवढा, नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागावी, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.