Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी लैंगिक अत्याचाराबाबत हायकोर्टात स्पष्टच सांगितले, आदित्य ठाकरेंना दिलासा!

Disha Salian Case Aaditya Thackeray Clean Chit :अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची दिशा सालियन ही मॅनेजर राहिली होती. त्यामुळे सुशांतसिंहच्या आत्महत्या आणि दिशाच्या आत्महत्ये प्रकरणात भाजपचे काही नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत होते.
Disha Salian, Aditya Thackeray
Disha Salian, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police : दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याची तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे आरोप दिशाचे वडिलांनी केले होते. त्या संदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

दिशावर आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्याचार केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. मंत्री नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांनी अत्याचार केल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकरणाबाबात पोलिसांनी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

मालवणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, दिशा सालियन हिची हत्या झाली तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोस्टमार्टममध्ये सिद्ध झाले नाही. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराची खूण आढळली नाही.

तिच्या योनीमार्गात वीर्य किंवा म्हणजे योनीमार्गात दुखापत आढळलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दिशा प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपींची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे पोलिसांनी सांगत आदित्य यांना क्लिन चिट दिली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची दिशा सालियन ही मॅनेजर राहिली होती. त्यामुळे सुशांतसिंहच्या आत्महत्या आणि दिशाच्या आत्महत्ये प्रकरणात भाजपचे काही नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत होते.

नितेश राणे हे उघडपणे दिशा हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते. त्यातच दिशाच्या वडिलांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचे तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी याचिक केली होती.

Disha Salian, Aditya Thackeray
Bhaskar Jadhav Politics : नाराज नाही म्हणणाऱ्या भास्कर जाधवांचा सरकारच्या विधेयकाला पाठींबा, सगळीच गणितं बदलली?

दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे?

पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच तसेची तिची हत्या केली नसल्याचे देखील सांगितले. दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचेबाबत तिच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसानी स्पष्ट केले. तसेच न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात केलेल्या याचिका फेटाळण्याची मागणी देखील पोलिसांनी केली आहे.

Disha Salian, Aditya Thackeray
Sangram Jagtap Death Threat : 'संग्राम जगतापला दोन दिवसांत मारणार', मेसेज आला अन् ...! अजितदादांच्या आमदाराच्या जीवाला धोका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com