Maharashtra Political News : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे अभूतपूर्व, चक्रावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण, कधी, कोणत्या पक्षात प्रवेश करील, याचा नेम राहिलेला नाही. लोकांनाही आता अशा प्रकारांचे नवल वाटेनासे झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक पक्ष सामावले गेले आहेत, त्यामुळे काही पक्षांतरे अडचणीची ठरत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे स्वगृही भाजपमध्ये पतरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. खडसे यांनी स्वतः तसे संकेत दिले आहेत. खडसे भाजपमध्ये परतणार असल्यामुळे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे चिंताग्रस्त झाले आहेत. आमदार पाटील यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे. Eknath Khadse returns BJP, but Eknath Shinde Group in tense.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde हे शुक्रवारी रात्री खासगी दौऱ्यावर धुळे येथे गेले होते. त्यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाची भेट घेतली. मी आहे, आपण काळजी करू नये, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार पाटील यांना दिल्याची चर्चा आहे. आमदार पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांचे धाबे दणाणले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार चंद्रकांत पाटील Chandrakant Patil विनाकारण चिंताग्रस्त झालेले नाहीत. मी आहे, काळजी करू नका, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणत असले तरी त्याचा कितपत उपयोग होईल, अशी शंका आमदार पाटील यांना असणार आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा आणि त्यात शिंदे गटाला घ्यावी लागलेली सपशेल माघार पाहता आमदार पाटील यांना चिंता वाटणे साहजिक आहे.
जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ओढवली आहे. उलट, खासगी दौऱ्यावर धुळ्याला आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत शिंदे गट भाजप उमेदवारांचा पूर्ण शक्तिनिशी प्रचार करणार, अशी ग्वाहीही दिल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election जागावापात महायुतीत अपेक्षेप्रमाणे भाजप वरचढ ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना जाहीर केलेली पाटील यांची उमेदवारी कापावी लागली. हिंगोलीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला.
सर्वेक्षण पाटील यांच्याविरोधात आहे, असे कारण भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवले. ते शिंदे यांना मान्य करावे लागले आणि पाटील यांची उमेदवारी कापण्याची नामुष्की मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ओढवली. हेमंत पाटील Hemant Patil यांच्याऐवजी शिंदे गटाने आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे रिंगणात आहेत.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी Bahvana Gawali या सलग पाचवेळा विजयी झाल्या आहेत, मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दबाबामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवार बदलला आहे. भावना गवळी यांना उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारी कापण्यात आलेले हिगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी येथून लढणार आहेत. नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचीही उमेदवारी कापली जाण्याची दाट शक्यता आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभेला इतका गोंधळ आहे तर विधानसभेला शिंदे गटाची अवस्था काय होणार, अशी भीती आमदार चंद्रकांत पाटील यांना वाटणे साहजिक आहे. मी आहे, चिंता करू नका, असे म्हणणारे मुख्यमंत्री वास्तवात हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे चिंता शिंदे गटातील अनेक आमदारांना आहे, शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार पाटील यांनी ती बोलून दाखवली, इतकेच.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.