Rohit Pawar On Scam : राज्याची तिजोरी कोण कोण पोखरतंय? रोहित पवार उघडणार तिसऱ्या घोटाळ्याची फाईल

Scam In Maharashtra : एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात घेण्यासाठी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांऐवजी राज्याची सूत्रे विनोद तावडे यांच्याकडे जात असल्याचे स्पष्ट होते.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : फी वाढवूनही स्पर्धा परीक्षांना होणारा विलंब,पेपरफुटीसारख्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, हे प्रश्न आमदार रोहित पवारांनी लावून धरले आहेत. तसेच राज्यातील शासकीय आश्रम शाळेत दूध पुरवठ्यातही घोटळा त्यांनी बाहेर काढला. शिक्षणातील गैरव्यवहारांसह पवारांनी आरोग्य विभागातील अॅम्ब्युलन्स घोटाळ्यावरूनही Ambulance Scam सरकारवर सडकून टीका केली आहे. यानंतर आता त्यांनी राज्यातील तिसरा महाघोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. Rohit Pawar Open Big Scam in Maharashtra.

पुणे दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांना Rohit Pawar खेकड्यासह घेतलेल्या पत्रकार परिषेदवरून पेटाच्या नोटीशीबाबत छेडले. त्यावेळी त्यांनी राज्याची तिजोरी मोठ्या प्रमाणात पोखरली जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच महायुती सरकारमधील तिसरा महाघोटाळा बाहेर काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता रोहित पवार Rohit Pawar कोणत्या घोटाळ्यावर बोलणार, त्याची किती डेप्थ असणार, याकडे लक्ष लागले आहे.

रोहित पवार म्हणाले, पेटाची नोटीस अद्याप आलेली नाही. ती नोटीस आल्यानंतर योग्यवेळी योग्य ते उत्तर देऊ. मात्र तो खेकडा हॉटेलमधून आणला होता. त्याला आणले नसते तर नसता तर कुणी तरी त्यास खाल्ले असते. प्रेस कॉन्फरन्सनंतर त्याला नदीत सोडून दिले आहे. आता त्या खेकडाचा शोध सुरू आहे. तो सापडल्यानंतर त्याच्यासोबत आणखी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ. मात्र जे लोक महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखरत आहेत त्यांचे काय ? आता लवकरच आपण तिसऱ्या घोटाळ्याची मोठी फाईल उघडणार आहे, असे म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnvais आणि अजित पवारांची धाकधूक वाढवली आहे.

Rohit Pawar
BJP Politics : जिथं लोकसभेत दिलेली उमेदवारी रद्द होते तिथं आमदारांचं कसं होणार? शिंदे गटात अस्वस्थता

यावेळी त्यांनी राज्यातील फडणवीसांचे महत्त्व कमी होत असल्याने त्यांच्या विश्वासावर बसलेल्या नेत्यांची धडधड वाढल्याचा टोलाही लगावला. एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात घेण्यासाठी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी Vinod Tawade प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांऐवजी राज्याची सूत्रे विनोद तावडे यांच्याकडे जात असल्याचे स्पष्ट होते. तावडे राज्यातील मोठे निर्णय घेत आहेत. परिणामी त्यांच्यासोबतचे नेते घाबरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ खडसे Eknath Khadse आणि प्रवीण माने यांच्या पक्ष सोडण्यावरून पवारांनी सरकारच्या हेतूवर बोट ठेवले आहे. खडसेंची तब्येत बिघडत आहे. अशा स्थितीतही त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी भाजपचे प्रयत्न असतील. त्यातून त्यांनी निर्णय घेतला असल्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले. तसेच प्रवीण माने यांचा मोठा व्यावसाय आहे. त्यामुळे माने हे स्वतःहून गेले की त्यांना मारून नेले, याबाबत माहिती घ्यावी लागेल, असे म्हणत पवारांनी भाजपर टीकास्त्र सोडले.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar
Beed Loksabha Election : OBC नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या? ; टी.पी.मुंडेंचा सवाल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com