Nitish Kumar Tejashwi Yadav  sarkarnama
विश्लेषण

Bihar Election Results : 'या' पाच कारणांनी बिहारमध्ये एनडीएची लाट, काँग्रेसच्या 'हाराकिरी'चा तेजस्वी यादवांना फटका!

NDA Nitish Kumar Tejashwi Yadav : बिहारमध्ये तब्बल 200 जागांच्या जवळ एनडीए गेली आहे. या एकतर्फी विजयामागे पाच कारणं महत्त्वपूर्ण ठरली आहे. काँग्रेसने तेजस्वी यांचा घात केल्याची देखील चर्चा आहे.

Roshan More

Bihar Election Results Analysis : बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. एक्झिट पोलमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येत असल्याची दिसत होते. त्याच प्रमाणे निकालाच्या दिवशी एनडीएने आघाडी घेत महागठबंधनला धुळ चारली आहे. तब्बल 192 जागांवर जेडीयू आणि भाजप युती असलेल्या एनडीएची आघाडी आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या राजद आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महागठबंधन 45 जागांवर आघाडी आहे. सत्तास्थापन करण्यासाठी 122 आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे एनडीएने हा एकर्फी विजय मिळवला आहे.

तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. नितीश कुमार यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत महागठबंधनने आपलीच सत्ता येणार असा दावा केला होता. एनडीएकडून नितीश कुमारांना मुख्यमंत्रि‍पदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले नव्हते. त्यामुळे त्यांना फटका बसले अशी शक्यता होती. मात्र, बिहारच्या मतदारांनी पुन्हा नितीश कुमार-भाजप यांच्या युतीवर विश्वास दाखवला आहे. त्या मागे सर्वात मोठे कारण आहे ते महिला आणि वाढलेला मतदानाचा टक्का.

80 लाख मतदारांचे मतदान वाढले

बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात तब्बल 70 टक्के मतदान झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदान वाढल्याने त्याचा फटका नितीश कुमार यांना बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्येक विधानसभेनुसार अंदाज 29 हजार मतदार वाढले होते. मात्र, हे वाढलेले मतदाराच महागठबंधनसाठी डोकेदुखी ठरले आहेत. वाढलेल्या मतांचा टक्का हा थेट एनडीएच्या झोळीत केला आहे. वाढलेल्या मतदारांनी सत्ते बदलण्यासाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी मतदान केले.

महिलांच्या खात्यात रोख रक्कम

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत तब्बल 10 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले गेले. सरकार पुन्हा आल्यानंतर आणखी जमा करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले होते. अगदी निवडणुकीच्या तोंडावर महिलांना हे पैसे मिळाले. 75 लाख महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली. त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत नितीश कुमारांना पुन्हा सत्तेत आणले. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली तशीच बिहारमध्ये महिला रोजगार योजनेमध्य दिलेले रोख रक्कमेने महागठबंधनचा धुव्वा उडावला.

नितीश कुमार यांच्यावर विश्वास

नितीश कुमार यांचे वय झाले आहे, असा दावा करत विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत होता. एनडीएकडून त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार म्हणून देखील घोषित केले नव्हते. त्यामुळे नितीश कुमार जाणार अशी हवा निर्माण झाली होती. तेजस्वी यादव यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता महगठबंधनची सत्ता येणार असे बोलले जात होते. मात्र, नितीश कुमार यांच्या सुशासन देणारा मुख्यमंत्री म्हणून चेहरा प्रोजेक्ट करण्यात आला. पुन्हा सत्ता आली तरी लालूंच्या काळातील जंगलराज परत येईल, असा प्रचार देखील एनडीएकडून करण्यात येत होता. विकासमध्ये बिहारमागे असला तरी सुशासन म्हणून नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या मतदारांनी विश्वास दाखवला.

मुस्लिम, यादव समीकरण तोडण्यात अपयश

तेजस्वी यादव यांच्या राजदचा मुख्य मतदार हा मुस्लिम आणि यादव आहे. याच मतदारांच्या जोरावर 2020 च्या विधानसभेत मुस्लिम आणि यादव मतदारांमुळेच राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, सत्ता मिळवायची असेल तर ईबीसी वर्गातून मोठा पाठींबा तेजस्वी यांना मिळणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी या निवडणुकीत प्रयत्न देखील केले. व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी यांना सोबत घेतले होते. मात्र, या युतीचा त्यांना फायदा झालेला दिसत नाही. ईबीसी वर्गातून पाठींबा न मिळाल्याचा मोठा फटका महागठबंधनला बसला आहे.

काँग्रेसची हाराकिरी

भाजप-जेडीयूची कामगिरी दमदार झाली आहे. त्या तुलनेत तेजस्वी यादव यांच्या राजद संघर्ष करताना तरी दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसने सपशेल हाराकिरी स्वीकारली. 60 हून अधिका जागांवर लढणारी काँग्रेस फक्त पाच ते सहा जागांवर विजयी होताना दिसत आहे. बिहारच्या निवडणुकीत सामाजिक न्यायावर बोलणाऱ्या काँग्रेसने तिकीट वाटपामध्ये सामाजिक न्याय दाखवलाच नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर तिकीट विकल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या आधी यात्रा काढून वातावरण निर्माती केली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी ते गायब झाल्याचे दिसून आले. काही सभा वगळता ते पूर्ण ताकदीने बिहारमध्ये उतरले नाहीत. काँग्रेसच्या या हाराकिरीचा फटका राजद देखील बसला आणि सत्तेपासून त्यांना दूर राहवे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT