Aleixo Reginaldo Lourenco

 

Sarkarnama

विश्लेषण

आधी काँग्रेसकडून उमेदवारी अन् नंतर राजीनामा देऊन धरली तृणमूलची वाट

काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली होती. काँग्रेसने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत पक्षाचे कार्याध्यक्ष अलेक्सि रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांचा समावेश होता. आता याच लॉरेन्स यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसला धक्का देत तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर आहेत.

लॉरेन्स यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोनवर आले आहे. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुर्टोरीम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना आज विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. त्यांना काँग्रेसचाची राजीनामा दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लॉरेन्स यांनी कुठल्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काही जाहीर केलेले नाही. असे असले तरी ते तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. लॉरेन्स यांच्या संपर्कात मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते होते. परंतु, त्यांनी भाजपला नकार दिला. ते कोलकत्याला रवाना होणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणर आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

गोव्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार, कामत हे मडगाव मतदारसंघातील लढतील. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेतेही आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या संकल्प आमोणकर यांचाही या यादीत समावेश असून त्यांना मडगाव मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना कुर्टोरीम मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले सुधीर कानोलकर यांना म्हापसा मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. कानोलकर हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. तळेगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिगेज हे लढतील. तर फोंडामधून पक्षाने राजेश वेर्णेकर यांना तिकीट दिलं आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात युरी आलेमाव आणि केपे मतदारसंघातून अँटोनी डीकोस्टा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर लॉरेन्स यांनी काँग्रेस सोडून पक्षाला तोंडावर पाडलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT