Satej Pati Gokul Election Result Update  sarkarnama
विश्लेषण

Gokul Election Result Update : सतेज पाटलांनी गेम फिरवला! महायुतीला नडले अन् विजय खेचून आणला! 'गोकुळ'मध्ये सत्ता फिक्स! 14 जागांवर विजय

Satej Patil MVA Win Vs Mahayuti : जिल्ह्यात महायुतीचे 10 आणि खासदार असतानाही त्यांना पराभवाचा सामाना करावा लागतो आहे. सतेज पाटील यांची समविचार आघाडी विजयाच्या जवळ आहे.

Roshan More

Gokul Election Result : तीन पक्ष एकत्र, महायुतीचे तब्बल 10 आमदार आणि दोन खासदार असतानाही सतेज पाटील यांनी 'गोकुळ'चे मैदान मारले आहे. 25 पैकी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 14 तर, महायुतीला 11 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सत्ताही सतेज पाटलांकडे असणार हे फिक्स झाले असून विजयाची घोषणा ही केवळ आता औपचारिकता राहिली आहे.

ं

मंत्री हसन मुश्रीफ यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांचे पुत्र गोकुळचे माजी अध्यक्ष नाविद यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, माजी दोन अध्यक्ष अरुण डेंगळे आणि विश्वास पाटील हे देखील पराभवाच्या छायेत आहेत.

सतेज पाटील यांनी निवडणुकीमध्ये महायुतीला अंगावर घेत 'गोकुळ'च्या खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला होता. संपूर्ण निवडणुकीत त्यांनी हीच भूमिका मांडत महायुतीला बॅकफूटवर ढकलेले होते. तर, महायुतीमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत संघर्ष होता. त्यामुळे महायुतीमधील पक्ष एकमेकांना किती साथ देणार याची देखील चर्चा होती.

मुंबईचा हस्तक्षेप खटकला?

गोकुळवर ज्याची सत्ता त्याच्या हातात जिल्हा असे चित्र कोल्हापूरमध्ये असते. त्यामुळे आता सतेज पाटील यांचे वर्चस्व वाढेल अशी चर्चा आहे. विशेष करून महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता. मुंबईवरून गोकुळ चालवले जाणार अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आणि तोच मुद्दा निवडणुक प्रचारात सतेज पाटील यांनी लावून धरला. त्याचा फायदा त्यांना झालेल्या दिसतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT