ekanth shinde, ravindra chavan  Sarkarnama
विश्लेषण

BJP Vs Shivsena : फोडाफोडीनंतर शिवसेनेच्या टार्गेटवर रवींद्र चव्हाण; एकनाथ शिंदेंपाठोपाठ मंत्री, आमदार अन् पदाधिकारी तुटून पडलेत

Shiv Sena internal conflict News : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत कमालीची खदखद आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याच पक्षप्रवेशावरून मित्र पक्ष शिवसेना नाराज झाला आहे. विशेषतः ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातील पक्षप्रवेशावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे कळते.

याच वादावरून काही दिवसांपूर्वी शिवसेनेने थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. हा वाद दिल्ली दरबारी पोचल्यानंतर ही फोडाफोडी थांबेल असे वाटत होते. या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शिंदे-चव्हाण चांगले मित्र असून लवकरच एकत्र जेवण करतील, असा आशावाद व्यक्त केला होता. मात्र, भाजपने पुन्हा पक्षप्रवेशाचा जोर वाढवला आहे. हा थेट घाव शिवसेनेवर पडत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत कमालीची खदखद आहे.

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर मंत्री, आमदार अन् पदाधिकाऱ्यांचंही धाडस वाढले आहे. त्यातूनच आता शिवसेनेचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी या फोडाफोडीनंतर भाजपवर जोरदार टीका केली. अॅक्शनला रिअॅक्शन येणारच अशा भाषेत चव्हाण यांना इशारा दिला. येत्या कळत होत असलेल्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषाही त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबईत गुरुवारी अंबरनाथ येथील शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. 2 पक्षातच एकमेकांच्या पक्षातील नेत्यांची पळवापळवी करायचे नाही असे ठरले होते. मात्र, या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, अशी तक्रार शिवसेनेकडून केली जात आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पदाधिकारीही नाराजी व्यक्त करत आहेत. भाजप अमिष दाखवून शिवसेना फोडत आहे, असा आरोप ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

निलेश राणेंनीही घेतला आहे रवींद्र चव्हाणांसोबत पंगा :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-शिवसेना युती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण कारणीभूत आहेत, असा दावा करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपविरोधात मोहीम उघडली आहे. भाजप पैसे वाटप आहे, रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गला आले की पैशांचा फ्लो कसा वाढतो? भाजपचे दबावाचे राजकारण आहे, असे अनेक आरोप करत आमदार राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT