Examination
Examination Sarkarnama
विश्लेषण

गुजरात दंगलीवेळी कुणाचं सरकार? बारावी परिक्षेतील प्रश्न अन् मागावी लागली माफी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : इयत्ता बारावीच्या परिक्षेमध्ये गुजरात दंगलीवरून (Gujrat Riots) प्रश्न विचारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. गुजरात दंगली झाल्या त्यावेळी कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (CBSE) यावरून जाहीर माफी मागावी लागली आहे. संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचेही मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

देशातील सर्वोच्च शिक्षण मंडळांपैकी CBSE हे एक प्रमुख मंडळ आहे. याच मंडळाच्या बारावीच्या परिक्षेतील समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीचा प्रश्न विचारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 'गुजरातमध्ये 2002 मध्ये मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचारावेळी कुणाचं सरकार होतं,' असा हा प्रश्न होता. या प्रश्नाखाली काँग्रेस, भाजप, डेमॉक्रॅटिक, रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले होते.

या प्रश्नावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंडळाने ट्विट करत याबाबत माफी मागितली आहे. इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र विषयाच्या पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न योग्य नव्हता. तसेच प्रश्नपत्रिका तयार करताना बाहेरील विषय तज्ञांनी सीबीएसईच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. ही चूक झाल्याचे सीबीआयला मान्य आहे. संबंधित व्यक्तींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं सीबीएसईकडून ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात दंगलीमध्ये सुमारे एक हजारांहून नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावण्यात आली होती. या गाडीमध्ये हिंदू भाविक होते. या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोठी दंगल उसळली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT