धक्कादायक : काँग्रेसच्या नेत्यानंच रचलं भाजप आमदाराच्या खूनाचे षडयंत्र

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
S R Vishwanath, Gopalkrishna
S R Vishwanath, GopalkrishnaSarkarnama
Published on
Updated on

बेंगलुरू : कर्नाटकमधील काँग्रेसचा (Congress) एक नेता व त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चर्चेचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये भाजपच्या (BJP) आमदाराच्या खूनाचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित आमदाराची सुरक्षा वाढवण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

कर्नाटकातील येलहंका मतदारसंघाचे आमदार एस. आर. विश्वनाथ (S R Vishwanath) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. या मतदारसंघातील विश्वनाथ यांनी काँग्रेसचे नेते गोलालकृष्ण यांचा दोनदा पराभव केला आहे. कथित व्हिडीओमध्ये गोपालकृष्ण (Gopalkrishna) आणि के. देवराज यांच्यातील संवाद आहे. हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी कर्नाटकातील काही स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हि़डीओ प्रसारित करण्यात आला.

S R Vishwanath, Gopalkrishna
भाजपची काल ममतांवर टीका अन् आज व्हायब्रंट गुजरातसाठी मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो!

'त्यांना मारून टाका, आमदाराला संपवा. ठीक आहे... कुणालाही कळू देऊ नका. ही आपल्यातीलच चर्चा आहे,' असा संवाद या व्हिडीओमध्ये आहे. काँग्रेस नेत्याने या कामासाठी एक कोटी रुपये देण्याचेही मान्य केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विश्वनाथ म्हणाले, 'याबाबत गृहमंत्री आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. गोपालकृष्ण यांना माझा खून करायचा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी,' अशी मागणी विश्वनाथ यांनी केली आहे.

गोपालकृष्ण यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिड़ीओ बनावट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी आमदारानेच हे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बेंगलुरू पोलिसचे आयुक्त कमल कांत यांनी शहर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे गुरूवारी सांगितले. पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी केली जाणार असल्याचे आधीच सांगितले आहे, असे ते म्हणाले. गृहमंत्री ए. ज्ञानेंद्र यांनीही या प्रकरणाची गांर्भीर्याने दखल घेत चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com