Halwa Ceremony Sarkarnama
विश्लेषण

Halwa Ceremony History : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी 'हलवा' का बनवला जातो, काय आहे याचा इतिहास?

Union Budget and Halwa Ceremony : वर्षांनुवर्षे चालत आलेली ही परंपरा एक वर्ष झाली होती खंडीत, जाणून घ्या तेव्हा नेमकं काय घडलं?

Mayur Ratnaparkhe

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात मध्यवर्गीय आणि निम्न वर्गीयांसाठी अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे जेव्हापण अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जवळजवळ येऊ लागते, तशी 'हलवा सेरेमनी'चीही चर्चा सुरू होते अर्थविभागातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची उत्सुकता असते.

तर देशभरातील अन्य बहुतांश लोकांना प्रश्न पडतो की, दरवर्षी अर्थसंकल्प(Union Budget) सादर होण्याआधी भल्या मोठ्या कढईत हलवा का केला जातो आणि याचे नेमेके महत्त्व काय आहे? तर याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात या 'हलवा सेरेमनी'चा नेमका उद्देश आणि इतिहास काय आहे.

अर्थसंकल्पाचे दस्तऐवजीकरण झाल्यानंतरग, हलवा समारंभ साजरा केला जातो. त्यालाच 'हलवा सेरेमनी' संबोधलं जातं. १९८०मध्ये सर्वप्रथम ही प्रथा सुरु झाली. हलवा सेरेमनी बजट प्रेसमध्ये होते. बजेट प्रेस ही नॉर्थ ब्लॉकमध्ये तळघरात आहे. याठिकाणी एका भल्या मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो आणि मग सर्वजण तो हलवा खातात. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून ते अर्थमंत्रालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होतात. यानंतर मग अर्थसंकल्पाची छपाई सुरू होते.

दहा दिवस अधिकारी नॉर्थ ब्लॉकमध्ये राहतात -

हलवा सेरेमनीनंतर अर्थसंकल्पाची छपाई होईपर्यंत 100 पेक्षा अधिक कर्माचारी आणि अधिकारी नॉर्थ ब्लॉकमध्येच राहतात. ही सर्व मंडळी दहा दिवसांपर्यंत नॉर्थ ब्लॉकमध्येच राहते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच ही सर्व मंडळी तेथून बाहेर पडतात. अर्थसंकल्पाशी निगडीत कोणतीही माहिती लीक होवू नये, यासाठी हा नियम केलेला आहे.

हलवा सेरेमनीचे आयोजन का केले जाते? -

हलवा सेरेमनीचे आयोजन अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या आधी केले जाते. कारण, देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थविभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कष्ट घेतलेले असतात आणि आता त्यांच्या त्या कष्टाला फळ मिळणार असते. त्यामुळे त्या सर्वांमध्ये एकप्रकारचा उत्साह असतो. तर भारतीय परंपरेनुसार कोणतेही शुभकार्य असल्यास गोड खाण्याची किंवा खावू घालण्याची परंपरा आहे. त्यामुळेच अर्थसंकल्प बनवण्यासाठी काम केलेल्या सर्वांचे हलवा खावू घालून तोंड गोड केले जाते.

एक वर्ष पडला होता या परंपरेत खंड -

वर्ष 2022मध्ये करोना महामारीमुळे आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक नियम बघता ही हलवा सेरेमनी केली गेली नव्हती. त्यावेळी अर्थसंक्लापेच दस्ताऐवजीकरणही झाले नव्हते. तर ते डिजिटल स्वरुपात सादर केले गेले होते. त्यावेळी हलवा सेरेमनी ऐवजी मिठाई वाटप केली गेली होती. करोना महामारी संपल्यानंतर मग परत पारंपारिक हलवा सेरमनीला सुरुवात झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT