Delhi Election 2025 : दिल्लीच्या निवडणुकीत भाजपकडून बिहारमधल्या मित्रपक्षांना जागा तर शिंदेंच्या शिवसेनेला भोपळा

Shiv Sena Eknath Shinde BJP Alliance : भाजप, आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच भाजपने एनडीएचे मित्रपक्षाला सोबत घेत निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.
Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आगामी काळात होत असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच एकीकडे इंडिया आघाडीची घडी विस्कटलेली आहे. इंडिया आघाडीतील आम आदमी पक्ष व काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उतरले असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. भाजप, आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच भाजपने एनडीएचे मित्रपक्षाला सोबत घेत निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

भाजपने (Bjp) 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 68 जागेवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिललीमध्ये भाजपने एनडीएचे मित्रपक्षाला सोबत घेत निवडणूक लढविण्याचे धोरण आखले आहे. या वर्षअखेरीस बिहारमध्ये विधनसभेच्या निवडणुका होणार असल्याने दिल्ली निवडणुकीतच बिहारमधील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पार्टीसाठी प्रत्येकी एक जागा सोडली आहे.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Saif Ali Khan Attacked:सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई अनसेफ? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमधील एनडीएचे मित्रपक्ष, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे असले तरी भाजपचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) एकही जागा सोडलेली नाही. दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वबळावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Saif Ali Khan Attacked : 'असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री, महाराष्ट्राचे दुर्दैव' ; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

शिवसेनेला एकही जागा नाही

दरम्यान, भाजपाचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक जागा हवी होती. याबाबत त्यांची भाजपशी चर्चाही झाली होती, पण शिवसेनेला दिल्लीत एनडीएमध्ये एकही जागा मिळू शकलेली नाही.

अजित पवार स्वबळावर

भाजपचा महाराष्ट्रातील आणखी एक मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) मात्र, या निवडणुकीत स्वबळावर 11 उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मित्रपक्षांना जागा सोडण्यास नकार दिला नाही.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
BJP News : कोकणातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठरणार का तारणहार?

भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पार्टीसाठी प्रत्येकी एक जागा सोडली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल बुरारीची तर लोक जनशक्ती (रामविलास) देवलीची जागा लढवणार आहे. एनडीएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) त्यांच्या अधिकृत चिन्हावर दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे पुढे यात आहे.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
NCP Candidate List : 'चलो दिल्ली'साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकले दुसरे पाऊल, तब्बल 30 जणांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com