Nandurbar Lok Sabha News  Sarkarnama
विश्लेषण

Nandurbar constituency: निवडून आल्यानंतर विसरण्याचा भूमिकेमुळे हिना गावित अडचणीत?

loksabha Election News : भाजपच्या उमेदवार हिना गावित गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या नाराज नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे उमेदवार गावित यांना आता चांगलाच घाम गाळावा लागत आहे.

Sampat Devgire

Nandurbar News: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा प्रचार जोरात आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारात दिसणारे महायुतीचे नेते मनातून त्यांच्यासोबत राहतील का? अशी चर्चा आहे.

नंदुरबार मतदारसंघात यंदा भाजपच्या (Bjp) हिना गावित (heena Gavit) आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी (Goval Padvi) यांच्या चुरशीचे वातावरण आहे. प्रारंभी डॉ. गावित यांना सोपी वाटणारी निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर सोपी राहिलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक निवडणुकीत गावित कुटुंबीयांचे "इलेक्शन वेल्डिंग" धोरण यंदा त्यांच्या अडचणीचे कारण बनले आहे. त्याचा रोजच अनुभव येत आहे. त्यामुळे उमेदवार गावित यांना आता चांगलाच घाम गाळावा लागत आहे.

नंदुरबार मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने यंदा उमेदवार बदलावा म्हणून भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली होती. त्यासाठी थेट वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेतली होती. मात्र, भाजपने उमेदवार बदललेला नाही. त्यामुळे गावित यांचे विरोधक मनापासून त्यांच्यासोबत किती काळ राहतील हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय जनता पक्षासाठी ही धोक्याची घंटा मानले जाते. नंदुरबार मतदारसंघात पक्षाला कितपत यश येईल ? हे महायुतीच्या नेत्यांमध्ये किती एकोपा निर्माण होतो यावर अवलंबून आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीचे विविध नेते हिना गावित यांच्या प्रचारात सक्रिय दिसतात. डॉ. गावित यांच्या प्रचार सभांनाही त्यांची हजेरी असते. मात्र याच नेत्यांनी प्रारंभी उमेदवारीला प्रखर विरोध केला होता. या विरोध करणाऱ्यांतील काही प्रमुख नेते अद्यापही प्रचारात दिसत नाहीत. या सगळ्यांना एकत्र करून वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपच्या डॉ. गावित सध्या व्यस्त आहेत. त्याला सहकारी पक्षांकडून मात्र पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबार येथील नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची गावित यांनी शनिवारी भेट घेतली. प्रदीर्घकाळ चाललेल्या भेटीत नंदुरबारच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

गावित यांनी रघुवंशी यांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर रघुवंशी यांनी आम्हाला आणि आमच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही याबाबत अनेकदा चर्चा झालेली आहे. सहकारी पक्षांना देखील कळविण्यात आले आहे मात्र अपेक्षित तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे रघुवंशी यांनी त्यांना आशीर्वाद दिलेत. मात्र, सहभाग असेल की नाही हे अस्पष्ट आहे.

'इलेक्शन वेल्डिंग पॉलिसी' यशस्वी ठरणार का ?

मंत्री डॉ. विजयकुमार गावित आपल्या प्रत्येक निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना विविध आश्वासने देऊन सक्रिय करतात. त्यांच्या गाठीभेटी घेऊन नाराजी दूर करतात. यालाच 'इलेक्शन वेल्डिंग पॉलिसी' असे नंदुरबारमध्ये म्हटले जाते. या वेल्डिंग पॉलिसीचा अनुभव त्यांच्या सर्वच विरोधकांना आलेला आहे. या अनुभवामुळे यंदा मात्र गावित यांची 'इलेक्शन वेल्डिंग पॉलिसी' कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका निर्माण झालेली आहे.

(Edited By : Sachin Waghamare)

SCROLL FOR NEXT