Hitendra Thakur News : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी पूर्वी पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले होते. बँकेवर गेली १० वर्षे सहकार पॅनलचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. आज झालेल्या मत मोजणीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवाल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे.
वसई-विरारच्या राजकारणात 'अप्पा' नावाने परिचित असलेले हितेंद्र ठाकूर यांची रणनीती या निवडणुकीत यशस्वी झाल्याची चर्चा आहे. वसई विरार मधील चारही जागा निवडून आणण्याच्या बरोबरच पालघर जिल्ह्यातील ४ जागा ही निवडून आणण्यात हितेंद्र ठाकूर यांचा मोठा वाटा आहे.
ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत पैसे वाटपाच्या मोठ्या प्रमाणत तक्रारी झाल्या होत्या. तर मतदानाच्या आदल्या रात्री ४० हजाराची रोकड पकडण्यात आली होती. या ठिकाणी ती जादू चालली नाही त्याच बरोबर भाजपचे दोन्ही आमदार निवडणुकीच्या प्रचारात उतरले असतानाही परिवर्तन पॅनलला मतदारांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढले होते. त्यामुळे जिल्हा बँकेत सहकार पॅनलला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकी पूर्वी बहुजन विकास आघाडीतील माजी नगरसेवकाने परिवर्तन पॅनल मधून उमेदवारी घेतल्याने येथील वातावरण चांगलेच तापले होते. प्रचाराच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांनी जे सोडून गेले त्यांच्यावर काढून टाकण्याची कारवाई करण्याचे संकेत दिल्याने ही निवडणूक वसई विरार मध्ये चर्चेची झाली होती.
निवडणुकीत वसई-विरारमध्ये ठाणे जिल्हा बँकेतील सर्व जागा सहकार पॅनलने जिंकून हितेंद्र ठाकूर यांच्यातील टायगर अभी जिंदा है " हे दाखवून दिले. तर क्षितिज ठाकूर यांनी फिल्डवर जे मॅनेजमेंट केले होते. त्याला यश आले असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी ठाणे पालघर बँक निवडणुकीत विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.