Raj Thackeray
Raj Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

सध्या मी शिव्याही खूप खातोय; त्यामुळे माझं वजन वाढलं असावं : राज ठाकरेंची मिश्किली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी पूर्वी असा जाड नव्हतो. बरीच वर्षे माझं आणि बाळासाहेब यांचं वजन सारखाचं म्हणजे ६३ किलो होतं. पण, अचानक त्या गोष्टी वाढायला लागल्या, तसं माझं वजनही वाढायला लागलं. पण, आता शारीरिक वजन कमी करून सामाजिक वजन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. माझं वजन वाढण्याचं कारण, सध्या मी शिव्याही खूप खातो, त्यामुळे माझं वजन कदाचित वाढलं असावं, अशी मिश्किलीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ते आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. (I have to increase my social weight by losing physical weight : Raj Thackeray)

राज ठाकरे यांचे व्याही डॉ. संजय बोरुडे यांच्या 'जनरेशन XL' नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (ता. २२ मे) पार मुंबईत पडला. लठ्ठपणा हा आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं २०१५ मध्ये घोषित केलं आहे. याच विषयावर आधारित जनरेशन एक्स एल या लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर पुस्तकाचे लेखण करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज ठाकरे यांच्यासोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित होते

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, काय खावं आणि काय खाऊ नये ते आशा ताईंनी सांगितलं. त्या उत्तम सुगरण आहेत. मी घरी गेलो तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खूप जेवण बनवलं होत. मग कमी कसं खाऊ? आता खाणं कमी नाही केलं तर मी देखील नव्वदीच्या घरात जाईनं. वयाच्या नव्हे; तर वजनाच्या, अशी कोटीही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली.

गेल्या काही वर्षात माझ्या आजारपणामुळे माझं वजन वाढलं. पण, सध्या घराघरांत डॉक्टर झाले आहेत. डायनिंग टेबलावर बसलं की प्रत्येकजण डॉक्टर होतो. वयानुरुप कमी खाललं पाहिजे. मी कायम ठरवतो. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. हे सर्वजणच करत असताात. मी एकटाच करतो, असे नाही.मी बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट खेळणारा. पण सध्या मला कोणत्याही एक्सरसाईज करता येत नाहीत. मला कोणताही खेळ खेळता येत नाही. त्या सर्व गोष्ठीला मी विटलो आणि एकदाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यानंतर मी काय धावणार आहे, अशातला भाग नाही. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की, ऑपरेशनंतर मला धावता येणार नाही. त्यावर मी त्यांना म्हटलं की ‘मी काय पाकीटमार आहे का फार धावायला.’ शस्त्रक्रियेनंतर सर्व काही सुरळीत होईल, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आज पुण्यात झालेल्या सभेत, राज ठाकरे यांनी आपल्यावर शस्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली. १ जून रोजी आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्टेजवरून बोलतानाच जाहीरपणे सांगितले. ते म्हणाले, “येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगत आहे, कारण कोणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं”, असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT