Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Prakash Ambedkar News : 2019 ला 'वंचित'ने 13 उमेदवारांना दिला होता धक्का; 2024 ला किती जणांना पाडणार?

Political News : गेल्या निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम असल्याने त्याचा वंचित आघाडीला काही प्रमाणात फायदा झाला होता. यावेळेस मात्र वंचित आघाडीसोबत एमआयएम नसणार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार.

Sachin Waghmare

VBA News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'नं 13 जागांवर 1 लाखांहून अधिक मते मिळवली होती. वंचितनं या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांचे मिळून एकूण 13 उमेदवार पाडले होते. वंचित आघाडीच्या या कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघात कोणत्या 13 उमेदवारांना पाडलं होतं ? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ला एकूण किती मतदान झालं होतं हे मतदारसंघनिहाय पाहू यात.

वंचित बहुजन आघाडीने (VBA) 2024 साली होणारी लोकसभा निवडणूक वेगळी लढली तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'मुळे आघाडीला 13 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम (MIM) असल्याने त्याचा वंचित आघाडीला काही प्रमाणात फायदा झाला होता. यावेळेस मात्र वंचित आघाडीसोबत एमआयएम नसणार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहण्यासाठी अजून काही काळ निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

अकोला मतदारसंघ :

अकोला मतदारसंघात भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना 2019 मध्ये 5,54,444 मते मिळाली तर आंबेडकर यांना 2,78,848 मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना 2,54,370 मते प्राप्त झाली.

सोलापूर मतदारसंघ :

अकोल्याप्रमाणे आंबेडकर यांनी गेल्या निवडणुकीत सोलापूरमध्ये निवडणुक लढवली. सोलापूर मतदारसंघात सिध्देश्वर महाराज यांना 5,24,985 मते मिळाली तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना 3,66,377 मते मिळाली. तर प्रकाश आंबेडकर यांना 1,70,007 मते प्राप्त झाली. आंबेडकरांची मते सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली असते तर ते विजयी झाले असते.

सांगली मतदारसंघ :

वंचितने सर्वाधिक मते 2019 च्या निवडणुकीत घेतली. जवळपास तीन लाख मते वंचितने घेतली होती. या मतदार संघात भाजपचे संजयकाका पाटील यांनी 5,03,615 मते मिळाली. दूसऱ्या क्रमांकाची 3,44,643 मते विशाल पाटील यांना मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3 लाख मते मिळाली. विजयी उमेदवाराने केवळ 1 लाख 64 हजार मते अधिक प्राप्त केली. पडळकरांची मते विशाल पाटलांना मिळाली असती तर विजय मिळवता आला असता.

बुलढाणा मतदारसंघ:

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांना 3, 88, 690 मते मिळाली तर वंचित आघाडीचे बळीराम शिरस्कार यांना 1, 72, 627 मते मिळाली होती. ही मते जर शिंगणे यांना मिळाली असती तर त्यांना विजय मिळवता आला असता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

गडचिरोली-चिमूर मतदारसंघ :

काँग्रेसचं डॉ. नामदेव उसेंडी यांना 4, 42, 442 मते मिळाली तर वंचितचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना 1, 11, 468 मते मिळाली ही मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली असती तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला नसता.

चंद्रपूर मतदारसंघ :

या मतदार संघात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना 3, 88, 690 मते मिळाली होती. वंचित आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना 1, 12, 069 मते मिळाली ही मते जर हंसराज अहिर यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते.

हिंगोली मतदारसंघ :

पराभूत उमेदवार : काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना 3, 08, 456 मते मिळाली होती. तर वंचितच्या मोहन राठोड यांना 1, 74, 051 मते मिळाली होती. ही जर मते वानखेडे यांना मिळाली तर विजयी झाले असते.

नांदेड मतदारसंघ :

काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 4, 46, 658 इतके मते मिळाली तर वंचितचे यशपाल भिंगे यांना 1, 66,196 मते मिळाली होती . हीच मते जर चव्हाण यांना मिळाली असती तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला नसता.

परभणी मतदारसंघ :

राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना 4, 96, 742 मते मिळाली. तर वंचितचे आलमगीर खान यांना 1, 49, 946 मते मिळाली. ही मते जर विटेकर यांना मिळाली असती तर विटेकर यांना पराभूत व्हावे लागले नसते.

औरंगाबाद मतदारसंघ :

वंचित-एमआयएम युती इम्तियाज जलील यांना 3, 89, 042 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 3, 84, 550 मते मिळाली. वंचितच्या उमेदवारामुळे खैरे यांचा पराभव झाला.

नाशिक मतदारसंघ :

राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना 2, 71, 395 मते मिळाली तर यांच्या विरोधातील वंचितच्या पवन कुमार यांना 1, 09, 981 मते मिळाली होती. भुजबळ यांना वंचितच्या उमेदवारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता.

लातूर मतदारसंघ :

काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना 3, 72, 384 मते मिळावी तर वंचितचये राम गरकर यांना 1, 12, 255 मते मिळाली त्यामुळे कामात यांचा पराभव झाला.

हातकणंगले मतदारसंघ :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 4, 89, 737 मते मिळाली. तर वंचितचे अस्लम सय्यद यांना 1, 23, 419 मते मिळाली. या फरकामुळे शेट्टींना पराभूत व्हावे लागले.

SCROLL FOR NEXT